Today’s Indian Vaccination Day: लसीकरणाचे महत्त्व लोकांना समजावे यासाठी १६ मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा केला जातो. लसीकरणाचे महत्त्व आणि सार्वजनिक आरोग्यात त्याची भूमिका मोठी ठरते. १९ व्या शतकात भारतात पोलिओ लसीचा पहिला डोस देण्यात आला. लसीकरण किंवा टीकाकरण हे अत्यंत संक्रामक रोगांपासून बचाव करण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) म्हणण्यानुसार, लसीकरण हा संक्रामक रोग नियंत्रित आणि या रोगाचा समूळ नायनाट करण्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे. सार्वजनिक आरोग्य आणि आपले जीवनमान सुधारण्यासाठी राष्ट्रीय, सामाजिक पातळीवर लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे.
देशात लसीकरणाचे महत्त्व आणि त्यांचे आरोग्यविषयक फायदे समजून सांगण्यासाठी एक सर्वसमावेशक धोरण,मार्गदर्शक तत्व ठरवून त्याची अंमलबजाणी करण्यात आली. प्राचीन काळापासून चेचक प्रतिबंधक लसीवर काम सुरू होते, १९ व्या शतकात लसीकरण संशोधनाने जोर पकडला, काही लस संस्थांची स्थापना झाली. कॉलरा लसीची चाचणी आणि प्लेग लसीचा शोध यांचा आढावा घेण्यात आला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला चेचक लसीकरणाचा विस्तार झाला. भारतीय लष्करातील कर्मचाऱ्यांमध्ये टायफॉइड लसीची चाचणी झाली आणि जवळजवळ सर्व तत्कालीन भारतीय राज्यांमध्ये लस संस्था स्थापन करून आव्हान पेलावे लागले. स्वातंत्र्यानंतर, बीसीजी लस प्रयोगशाळा आणि इतर राष्ट्रीय संस्था स्थापन झाल्या, अनेक खाजगी लस उत्पादक उदयास आले. १९७७ मध्ये देश चेचकमुक्त झाला.
राष्ट्रीय लसीकरण दिनाचा इतिहास
लसीकरणाचा शेकडो पूर्वचा इतिहास आहे. चिनी लोकांनी १००० इसवी. सनापासून चेचक लसीकरणाचा वापर केल्याचे सांगण्यात येते. युरोप आणि अमेरिकेत लसीकरण सुरू होण्याआधी आफ्रिकन आणि तुर्की लोकही ते करत असल्याचे बोलले जाते.
१९७६ मध्ये एका १३ वर्षांच्या मुलाला काउपॉक्स (cowpoxe) विषाणू प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. चेचक रोगप्रतिकारक शक्ती वाढवल्याने एडवर्ड जेनर यांना लसीकरणशास्त्राचे संस्थापक मानले जाते. १७९८ मध्ये पहिली चेचक लस विकसित करण्यात आली. १८ व्या आणि १९ व्या शतकात त्यासाठी प्रभावी काम केलं. १९७९ मध्ये मोठ्या प्रमाणात चेचक लसीकरणामुळे रोगाचे उच्चाटन झाले. कॉलरा आणि अंत्रेक्सलुई पाश्चरच्या प्रयोगांमुळे कॉलरा आणि अँथ्रॅक्स सारख्या रोगांना पराभूत करण्यासाठी काम झाले, कॉलरा आणि अँथ्रॅक्स लसींचा विकास झाला, आणि १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात प्लेग लस देखील शोधण्यात आली. १८९० ते १९५० दरम्यान, जीवाणूजन्य लसींचा विकास वाढला, ज्यामध्ये बीसीजी लसीकरणाचा समावेश आहे, जे आजही वापरतो. १९२३ मध्ये, अलेक्झांडर ग्लेनी यांनी फॉर्मल्डिहाइडसह टिटॅनस विष निष्क्रिय करण्याच्या लसीचा ही शोध लावला त्यानंतर त्याच पद्धतीनेे १९२६ मध्ये डिप्थीरिया लस विकसित झाली. १९५० ते १९८५ पर्यंत विकसित झालेल्या विषाणूजन्य ऊती संस्कृती पद्धतींमुळे साल्क आणि सॅबिन पोलिओ लसींचा उदय झाला. मोठ्या प्रमाणात लसीकरणामुळे, जागतिक स्तरावर अनेक देशांमध्ये पोलिओचे जवळजवळ निर्मूलन झाले आहे.
गेल्या दोन वर्षांत आपण लसीकरणात मोठी प्रगती केली आहे.
. १९४० च्या मोठ्या प्रमाणातील लस उत्पादन वैज्ञानिक ज्ञान मोठ्या प्रमाणावर लसी उत्पादन आणि रोग नियंत्रण प्रयत्न
. १९६० च्या दशकात एम. एम. आर. लस गोवर , मंप, आणि रुबेला लस एकत्र करुन एम आर लस जातात.
. लस १९७२ मध्ये लहान देवीची लसी काढून टाकण्यात आली.
. जगभरात २०२० ला कोविड -१९ महामारी पसरली तेव्हा या महामारीशी लढण्यासाठी कोविड १९ वर कोविशिल्ड, कोवॅक्सिन लस काढून मोठया प्रमाणात टीकाकरण करण्यात आले.











