Dr. Babasaheb Ambhedkar Jayanti: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रबोधन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने संत चोखामेळा बोर्डिंग येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप तसेच अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर सप्ताहाच्या माध्यमांतून होणार आहे.
या कार्यक्रमास जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा), भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक जी सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी यांची उपस्थिती होती. बाबासाहेबांनी सामजिक एकता, समता आणि बंधुता याची अनमोल शिकवण दिली
त्याच्या विचारणा स्मरण करून त्यावर चालण्याचा निर्धार आज केला गेला. यावेळी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत तसेच अन्नदान करण्यात आले या माध्यमातून समाजात सेवा व समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आला.
या वेळी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, प्रबोधन सप्ताहाचे जिल्हा संयोजक आशिष सपकाळे, सह संयोजक ज्योती निंबोरे, सह संयोजक मनोज सोनवणे, दिपक परदेशी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. नितु ताई परदेशी,मंडळ अध्यक्ष विनोद मराठे, नगरसेवक अरविंद देशमुख,पंकज जैन,शुभांगी बिऱ्हाडे,संगीता पाटील,तारा पटेल,पवन खंबायते,सुनील वाणी,दिपक बाविस्कर,सचिन कोळी राजू डोंगरे हरिओम सूर्यवंशी समाज सेवक एड आनंद कोचुरे समाजसेवक चेतन ननवरे इ. सुनील जाधव कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.








