Amlner News: नागरी समस्यांची जाण असलेल्या नगरसेविका सुवर्णा तुळशीराम हटकर आणि सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम हटकर यांनी विकासकामांसाठी पुढाकार घेतला आहे. अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील पाण्याच्या समस्येबाबत हटकर दाम्पत्यांनी जातीने लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. या भागात होणाऱ्या अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरीक त्रस्त होते. हटकर यांच्या प्रयत्नांनी या भागातील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रभागात कामाला सुरुवात झाली आहे.
अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. या भागात निर्धारित वेळत पाणीपुरवठा न होता अनियमित पाणीपुरवठा होत आहे. परिणामी नागरीकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेता नगरसेविका सुवर्णा हटकर व सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम हटकर यांनी पुढाकार घेत नगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा करुन या भागातील पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला मंजुरी मिळवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.
सध्या युद्धपातळीवर या भागातील पाईपलाईनचे काम सुरु असून सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम हटकर हे स्वत: थांबून काम करुन घेत आहे. तुळशीराम हटकर यांच्या या कार्यतत्परतेमुळे प्रभाग क्रमांक १४ मधील पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.








