होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

इराणच्या बंदरांची अमेरिकेकडून नाकाबंदी; जागतिक ऊर्जा संकट वाढवणार..!

On: April 13, 2026 12:21 PM
Follow Us:
---Advertisement---

American-Israel Vs Iran conflict: अमेरिका आणि इराण मधील शांतीवार्ता फिसकटल्यावर राष्ट्रपती ट्रम्प यांनी इराणच्या बंदरांमध्ये येणाऱ्या आणि तिथून बाहेर पडणाऱ्या सर्व सागरी वाहतुकीला बंद करण्याचे आदेश दिले आहे. मार्ग बंद करण्याच्या प्रयत्न केल्यास अमेरिकेसाठी घातक निर्णय ठरेल, असा इशारा इराणच्या (IRGC) लष्कराने दिल्याचे वृत्त इराणची निम-सरकारी वृत्तसंस्था तस्नीम न्यूजने दिले आहे. येतील वाहतूक बंद झाल्यास तेल आणि व्यापारावर परिणाम होऊन ऊर्जा संकट वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण आशियाला त्याचा जास्त फटका बसेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

‘आयआरजीसी’ने (IRGC) म्हटले, या ठिकाणी आमचे पूर्ण नियंत्रण आहे. कोणतेही चुकीचे पाऊल टाकले तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा अमेरिकेला दिला आहे, असे वृत्त तस्नीम न्युजने दिले आहे. दरम्यान राष्ट्रपतीच्या आदेशानंतर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने इराणच्या आजूबाजूच्या बंदरांची वाहतूक आज सकाळपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने याआधीच या मार्गाचा चोक पॉईंट बंद केला, आता अमेरिकेने या मार्गाची वाहतूक रोकण्याचा निर्णय घेतला आहे.

रविवारी संध्याकाळी जारी केलेल्या एका निवेदनात, अमेरिकेच्या मध्यवर्ती कमांडने म्हटले आहे की, १३ एप्रिल रोजी सकाळपासून इराणच्या बंदरांमध्ये येणाऱ्या आणि तिथून बाहेर पडणाऱ्या सर्व सागरी वाहतुकीला लागू होईल. यामध्ये इराणची बंदरे आणि किनारी भागांमध्ये प्रवेश करणाऱ्या किंवा तिथून निघणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या जहाजांचा” समावेश आहे. त्यात आखाती प्रदेश आणि ओमानच्या आखातातील जहाजांचाही समावेश आहे, असे अल जंजिराने वृत्त दिले आहे.

अमेरिकेचे माईन्स जहाजे होर्मुझ सामुद्रधुनी इराणने टाकलेल्या माइन्स काढून समुद्री मार्ग मोकळा करत आहे. त्यानंतरच येथून सुरक्षित वाहतूक करता येणार आहे, असे अमेरिकेच्या मरीन कमांड तर्फे सांगण्यात आले. तेल आणि गॅस वाहतुकीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे जगाच्या अडचणी वाढणार आहे. पाकिस्तानमध्ये पार पडलेल्या शांतता चर्चेच्या दीर्घ सत्राचा कोणताही करार न होता समारोप झाल्यानंतर, तेहरानवर दबाव टाकण्याच्या उद्देशाने अमेरिकन लष्कराने सोमवारी इराणच्या सर्व बंदरांची नाकेबंदी करण्यास सुरुवात करणार असल्याची घोषणा केली आहे.(American-Israel Vs Iran conflict

२१ तासांच्या चर्चेनंतर ही करार होऊ शकला नाही, मात्र इराणला अण्वस्त्र ठेवता येणार नाही असे जेडी वॅन्स यांनी स्पष्ट केले. कोणत्या ही अटी मान्य करण्यास इराण तयार नाही. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहे. दरम्यान ‘आयएमएफ’ने इशारा दिला आहे की, युद्ध जर असेलच चालू राहिले तर महागाई वाढण्याची शक्यता आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment