Varangaon News: वरणगावमध्ये एक १० वर्षीय मुलगा अचानक हरविल्याने शहरात चिंत्याचे वातावरण होते. ईकबाल शहा हसन शहा (वय ३०, व्यवसाय, मजुरी) यांचा मुलगा शुक्रवारी दुपारी १२ ते १३:३० वाजेच्या दरम्यान घरातून काही न सांगता निघून गेला. मुलगा न दिसल्यामुळे कुटुंबीयांत चिंता आणि भीती पसरली, त्यामुळे संपूर्ण वरणगाव परिसरात त्याचा शोध सुरु झाला.
मुलाच्या हरविल्याची तक्रार रात्री ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. तत्काळ पोलिसांनी विशेष पथक नेमले आणि शहरातील भुसावळ परिसरातील बसस्थानक व रेल्वे स्थानकांची सीसीटीव्ही तपासणी सुरु केली.पोलिस तपास पद्धतशीर आणि गुप्त माहितीवर आधारित होता. पोलीस पथकाने स्थानिक तपासणी, सीसीटीव्ही फुटेज, आणि रेल्वे स्थानक परिसरातील निरीक्षण यांचा एकत्रित उपयोग केला. तसंच पोलिसांनी परिसरातील लोकांशी बोलून माहिती गोळा केली.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम थेट दिसला मुलाचा ठाव भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात लागला. अपहरणाची भीती बाळगणाऱ्या कुटुंबासाठी ही आनंदाची आणि दिलासादायक बातमी होती. फक्त दोन तासांच्या मेहनतीनंतर वरणगाव पोलीसांनी मुलाला सुरक्षितपणे शोधून आई-वडिलांच्या ताब्यात दिले. कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहून परिसरातील नागरिकांनी पोलीस यंत्रणेची स्तुती केली.
तपासादरम्यान सहा.पो.निरीक्षक अमित कुमार बागुल यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीसह पोलीस पथक नेमले, ज्यात पोलिस सुकराम सावकारे (क्राईम रायटर), पोलिस फिरोज पठाण, पोलिस सुनिल जाधव आणि पोलिस प्रशांत ठाकुर यांचा समावेश होता. पोलीस पथकाने भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात तपास करून मुलाला शोधले. अपहरण झालेला मुलगा गुन्हा नोंद झाल्यानंतर एक ते दिड तासात सुरक्षितपणे सापडला.
वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीसक अमित कुमार बागुल यांनी नागरिकांना आवाहन केले की, मुलांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहावे, आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. या घटनाक्रमातून पोलिसांच्या तत्परतेचा, योजना आखण्याचा आणि वेगवान कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.








