होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Nashik Crime News: नाशिकमधील धर्मांतराच्या रॅकेटचा कसा झाला पर्दाफाश? वाचा…

On: April 10, 2026 3:59 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik Crime News: राज्यासह संपुर्ण देशात सध्या नाशिक चर्चेत आले आहे. कॅप्टन अशोक खरात, रविंद्र एरंडेसह आता आयटी क्षेत्रातील महिल्यांवरील अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे.नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणी आणि महिलांना जाळ्यात ओढून, त्यांचे लैंगिक शोषण, विनयभंग आणि धर्मांतर करण्याचा एक धक्कादायक प्रकार नाशिकच्या आयटी क्षेत्रातुन समोर आले आहे. एका नामांकित कंपनीच्या आडून सुरू असलेल्या या ‘जिहादी’ मानसिकतेच्या कृत्याचा नाशिक पोलिसांनी अत्यंत गोपनीय आणि धाडसी पद्धतीने तपास करून छडा लावला आहे. धक्कादायक अशा या प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली असून, यात दोन महिलांचाही समावेश आहे.

काय आहे प्रकरण ?

नाशिकमधील धर्मांतराचं रॅकेट हे अत्यंत धक्कादाय आणि तितक्याच नियोजन पद्धतीने चालविलं जात होत. यासाठी बेरोजगार तरुणींना आकर्षक पगाराचे आमिष दाखवून या कंपनीत नोकरीला ठेवले जात असे. कॉल सेंटरप्रमाणे काम करून घेताना टीम लीडरच्या माध्यमातून या तरुणींवर पाळत ठेवली जात होती. विश्वास संपादन केल्यानंतर विशिष्ट विचारधारेच्या नराधमांकडून तरुणींचा मानसिक छळ, विनयभंग आणि लैंगिक शोषण केले जायचे, या शोषणामागचा मुख्य उद्देश या तरुणींचे धर्मांतर करणे हाच होता.

महिला पोलिसांनी राबविले ‘अंडरकव्हर’ ऑपरेशन

नाशिकच्या या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीसांनी अंडरकव्हर ऑपरेशन राबविले. या छळाला कंटाळलेल्या एका धाडसी तरुणीने थेट नाशिक पोलीस आयुक्तांकडे दाद मागितली होती. त्यानुसार, वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 7 जणांची एक विशेष टीम तयार करण्यात आली. या महिला पोलिसांनी स्वतःची ओळख लपवून या कंपनीत नोकरी मिळवली. आठ दिवस त्यांनी तिथे काम शिकले आणि आरोपी कशा प्रकारे मीटिंगमध्ये मुलींवर दबाव टाकतात, त्यांचे शोषण करतात याचे ठोस तांत्रिक पुरावे गोळा केले. दरम्यान, पीडित तरुणींनी या प्रकाराबाबत कंपनीच्या HR विभागाला वेळोवेळी कल्पना दिली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही तपासात समोर आले.

पुरावे जमा केल्यानंतर, पोलिसांनी या कंपनीवर छापा टाकून 9 गुन्हे दाखल करत सहा जणांना बेड्या ठोकल्या. यात 8 महिलांनी लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नाबाबत, तर एका पुरुषाने धर्मांतरासाठी छळ केल्याची तक्रार दिली आहे. 6 अविवाहित तरुणी आणि 2 विवाहित महिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कंपनीची HR अश्विनी चैनानी हिला पुण्यातून ताब्यात घेऊन 4 तास चौकशी केली असून तिला नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी सध्या पाच आरोपी पोलीस कोठडीत असून एक जण न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणातील एक महिला आरोपी अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment