होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

नाशकात हे चालले तरी काय? महिलांच्या लैगिक शोषणाचे हे चौथे प्रकरण उघडकीस!

On: April 9, 2026 1:23 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik Crime News: नाशिकमध्ये एका हॉटेलनंतर अशोक खरात आणि व्यावसायिक लैंगिक शोषण प्रकरण समोर आले, ही प्रकरणे गाजत असतांच, आता एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे नाशिकमधले हे चौथे प्रकरण उघडकीस आले आहे.

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे, या कंपनीतील संबधीत आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून आणि नंतर नोकरी दिल्याचे उपकार दाखवत महिलांना जाळ्यात ओढले आणि फसवणूक करून अत्याचार केल्याची पीडितेच्या तक्रारीनुसार, सुट्टीच्या दिवशी तिला एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणाचे गांभार्य लक्षात घेऊन शहर पोलिसांनी अत्यंत गोपनीयता पाळून तपास केला. २५ मार्च रोजी देवळाली कॅम्प येथे पहिला गुन्हा दाखल झाल, त्यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणखी आठ गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन व तौसिफ अत्तार या पाच संशयितांना अटक केली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांकडे बघून अश्लील हावभाव करणे आणि त्यांच्या धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणे, असे प्रकार तिथे सुरू होते. केवळ महिलाच नव्हे, तर एका तरुण कर्मचाऱ्याला देखील धर्मांतरासाठी भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आल्याचे सांगितले जाते. या सर्व आरोपीना न्यायालयात हजार केले असता त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणाच्या सखोल तपास करण्यासाठी पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहे.

नोकरीच्या मुलाखतीपासूनच महिलांना लक्ष्य करण्याची ही पद्धत अत्यंत गंभीर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे आणि किती महिला या शोषणाला बळी पडल्या आहेत, याचा कसून तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत. दरम्यान एका पाठोपाठ नाशिकमध्ये असे प्रकरण उघडकीस येत असल्याने नाशिककर हादरून गेले आहे. त्यामुळे या प्रकरणासह इतर प्रकरणात पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी अपेक्षा नाशिककर करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment