New E- KYC System: बँकेशी संबंधित काम असो किंवा एखादी सरकारी योजना, प्रत्येक ठिकाणी वारंवार केवायसी (KYC) करण्याची कसरत आता संपणार आहे. केंद्र सरकारने CKYC (Central Know Your Customer) ही नवीन प्रणाली आणली असून, यामुळे तुम्हाला प्रत्येक नवीन कामासाठी आधार किंवा पॅन कार्डची प्रत सादर करण्याची गरज भासणार नाही. एकदा का तुम्ही तुमचा १४ अंकी CKYC नंबर जनरेट केला की तुमची ओळख पूर्णपणे डिजिटल स्वरूपात जतन केली जाईल.
CKYC म्हणजे नेमके काय? –
सेंट्रल केवायसी ही एक अशी मध्यवर्ती प्रणाली आहे जिथे तुमचे फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित साठवली जातात. एकदा का हा १४ अंकी नंबर तुमच्या नावावर नोंदवला गेला की, कोणत्याही बँकेत नवीन खाते उघडताना किंवा गुंतवणूक करताना तुम्हाला फक्त हा नंबर द्यावा लागेल. यामुळे कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत बाळगण्याची किंवा वारंवार बायोमेट्रिक देण्याची डोकेदुखी कायमची मिटणार आहे.
CKYC नंबर मिळवण्याची सोपी पद्धत –
हा नंबर जनरेट करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी लॅपटॉप किंवा मोबाईलवर ‘CKYC’ टाईप करून अधिकृत सरकारी पोर्टलला भेट द्यावी लागेल. तिथे गेल्यावर ‘New User To CKYC’ या पर्यायावर क्लिक करून तुमचा अधिकृत मोबाईल नंबर आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरायचा आहे. यानंतर विचारलेली काही प्राथमिक माहिती भरून प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक एसएमएस आणि एक लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचे अधिकृत CKYC कार्ड अगदी सहज डाऊनलोड करू शकता.
या डिजिटल ओळखपत्रामुळे तुमची बँकिंग सेवा अधिक वेगवान आणि पारदर्शक होणार आहे. वारंवार होणाऱ्या केवायसी प्रक्रियेचा कंटाळा येत असेल तर आजच तुमचा सी-केवायसी नंबर मिळवून तुमचे आर्थिक व्यवहार सुटसुटीत करा याविषयी अधिक माहिती शासनाच्या संकेत स्थळावर किंवा आपल्या परिसरातील आपले सरकार केंद्रांवर मिळेल.









