Jalgaon News: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी साज-या होणा-या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी विविध भागांतून मुंबईकडे तसेच मुंबईहून घरी परत रेल्वेने प्रवास करणार आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवासासाठी सहकार्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान १४ एप्रिलच्या अनुषंगाने आंबडेकर अनुयायी मोठ्या संख्येनं मुम्बई कडे जातात त्यामुळे या दरम्यान मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भुसावळ या मार्गावर मोठी गर्दी असते, येणारी प्रत्येक रेल्वे गाडी ही प्रवाश्यानी भरलेली असते. त्यामुळे प्रवाश्यांचा प्रवास सुरक्षित आणि चांगला व्हावा यासाठी रेल्वे तर्फे विशेष उपाय योजना आखण्यात आल्या आहेत, तसेच रेल्वेने काही गाईड लाईन जारी केल्या आहेत, त्याचे पालन करण्याचे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रवाशांनी आरक्षित डब्यांमधून अनधिकृत प्रवास करू नये. या डब्यांमधून केवळ वैध आरक्षण तिकिट असेल तरच प्रवास करावा. प्रत्येक प्रवाशाने योग्य व वैध तिकिटासहच प्रवास करावा. विनातिकिट प्रवास करू नये. सुरक्षित व सुरळीत प्रवासासाठी अनावश्यक कारणास्तव चेन पुलिंग करू नये. प्रवाशांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी स्थानकांवर रेल्वे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. सुरक्षित व शिस्तबद्ध प्रवासासाठी सहकार्य करावे. असे रेल्वे तर्फे आवाहन करण्यात आले आहे.







