Jalgaon News: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे दि. १४ एप्रिल रोजी सायंकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीत विविध भागातील ४२ मंडळांचा सहभाग राहणार आहे. ठिकठिकाणी निळे झेंडे लावण्यात आल्याने शहर निळेमय झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अभिवादन सभा होणार आहे.
जळगाव शहर जयंती उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि.१४ एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता मुकुंद सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली व आ. राजूमामा भोळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, महापौर दीपमाला काळे, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी हरिश्चंद्र सोनवणे ,प्रा.प्रीतीलाल पवार,प्रा.किसन हिरोळे,महेंद्र केदार व उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शहराच्या सुभाष चाक, महात्मा फुले मार्केट, टावर चोक, नेहरु पुतळा मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रंलीची सांगता करण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या अनुषंगाने शहरात ठिकाठकाणी निळे ध्वज आणि पताका लावण्यात आले.काही ठिकाणी रोषणाई करण्यात आली होती. सर्वत्र जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते.सार्वजनिक मंडळांतर्फे १४ एप्रिल रोजी सर्वत्र पंचशिल आणि बुद्धवंदना होईल. तसेच शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.







