होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सदाबहार गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड..

On: April 12, 2026 4:18 PM
Follow Us:
---Advertisement---

Ashatai Bhosle News: भारतीय चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं रविवारी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९३ वर्षांच्या होत्या. शनिवारी रात्री थकवा आणि छातीतील संसर्गामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक बनली, त्यांचे सर्व अवयव निकामी झाल्याने त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या (सोमवार) दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती आनंद भोसले यांनी दिली. तसेच त्यांचे पार्थिव शरीर सकाळी ११ ते २ दरम्यान लोअर परळ येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेण्यासाठी ठेवण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

अनेक दशकापासून त्यांनी हिंदी आणि इतर भाषेत गाणे गाऊन भारतीय चित्रपट सृष्टीत आपला ठसा उमटवला. त्यांनी हजारो गाणी गायली त्यामुळे त्यांचे नाव बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले आहे. हिंदी व्यतिरिक्त, आशा भोसले यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहे. त्यात मराठी, गुजराती, बंगालीसह २० भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्‍या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. आदी भाषांमध्येही गाणी गायली आहेत.’पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ ही गाणी अजरामर झाली, त्यांच्या गायनात पाश्चात्य आणि भारतीय शैलीचा सुरेख संगम होता, त्यामुळे त्यांची गाणी भारतातच नाही, तर जगभर ऐकली जाऊ लागली.

तसेच १९४३ साली प्रदर्शित झालेल्या ‘माझा बाळ’ या मराठी चित्रपटापासून त्यांनी गायकी सुरू केली. तर त्यांचे पहिले हिंदी गीत ‘सावन आया’ हे होते भारतीय संगीत सृष्टीचे त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यांची गाणी कायम स्मरणात राहतील, एवढेच नाही तर आताची झेन झेड देखील त्यांची चाहती होती, त्यांना देखील आशाताई च्या गाण्याची भूरळ होती. त्याच्या निधनाची बातमी कळताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment