Jalgaon News: भाजप पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहिला असून 2 खासदारपासून ते 303 खासदारांपर्यंत पक्षाने आपली स्थान प्राप्त केले. तसेच सर्वसामान्य जनतेच्या आश्वासन पूर्ण केले. संपूर्ण जगात व देशात राजकीय संघटन एक नंबर असल्याचे प्रतिपादन आ.सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांनी केले. भाजपा पक्षाचा 46 वा स्थापनादिन कार्यक्रम जिल्हा महानगर भाजप कार्यालय जी.एम.फाउंडेशन व जुने भाजप कार्यालय बळीराम पेठ येथे पक्ष ध्वजवंदन, विविध उपक्रम कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
सोमवारी सकाळी 8:30 वाजता जी.एम.फाउंडेशन येथे भाजप जेष्ठ कार्यकर्ते मधुकर मांढरे यांच्याहस्ते पक्ष ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम भाजपाच्या दिवंगत कार्यकर्ते व ज्ञात अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम व महाराष्ट्र गीताने सुरू झाली. भाजपा महानगरच्यावतीने 46 जेष्ठ व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये स्मृतिचिन्ह भाजपाचा गमच्या व तांब्याचा दिवा असे सन्मानाचे स्वरूप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
सर्वप्रथम गजानन जोशी, मधुकर मांढरे, उदय भालेराव, भगत बालानी, सुनील बढे, कवरलाल संघवी, अरुण बोरोले, उज्वला बेंडाळे, मुकुंद मेटकर, यशवंत पटेल, लीलाधर ठाकरे, सुनील नारखेडे, विशाल त्रिपाठी, रमेश जोगी, गजानन नेवे, अशोक कोष्टी, किशोर नारखेडे, प्रदिप रोटे, पार्वतीबेन पटेल, रजनी महाजन, महाश्वेता माथुरवैश्य, कुसुम सोनवणे, मालती पाटील, बाणाबाई शेवाळे, किसन मराठे, भाग्यश्री चौधरी, सुशील हसवाणी, बाळू कासार, पुरुषोत्तम वाणी, मुकुंद कासार, देवानंद बारी, विकास घोडके, संजय भावसार, पुंडलिक सपकाळे, राजेंद्र मराठे, सुभाष सोनवणे, दीप्ती चिरमाडे आदींचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले. प्रमुख मार्गदर्शन सदाशिव पाटील यांनी जनसंघ ते भाजपा या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन जोशी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर आ सुरेश भोळे (राजू मामा) सांगितले की 1980 झालेल्या भाजपच्या स्थापनेला आज 46 वर्षे पूर्ण होत आहे आणि आज आपण या 46 ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा जो सत्कार केला. हा त्यामागील त्यांच्या पक्षासाठी त्याग, परिश्रम व त्यांनी केलेल्या पक्षासाठी योगदानाबद्दल आजचा सोहळा बघत आहोत. भाजपा पक्ष हा 365 दिवस कार्य करणारा पक्ष असून या जेष्ठ कार्यकर्त्यांनी दिलेल्या अथक परिश्रमानेच आज केंद्रात व राज्यात सर्वसामान्य जनतेसाठी व कार्यकर्त्या आपण सुखी व आनंदाचे दिवस पाहत आहोत,असेही त्यांनी सांगितले.
यानंतर खा स्मिता वाघ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ.चंद्रशेखर पाटील, मनपा सभागृह नेतेे नितीन लढ्ढा, गटनेते प्रकाश बालानी, उदय भालेराव, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र सोनवणे, विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, महिला अध्यक्ष नितू परदेशी, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज भांडारकर यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजक प्रदीप रोटे व सह सयोजक सागर पाटील होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.







