होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

युद्धजन्य परिस्थितीत घरगुती गॅसचा काळाबाजार, राज्यात पहिला गुन्हा दाखल

On: March 12, 2026 7:06 PM
Follow Us:
---Advertisement---

LPG Gas Shortage: अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाची धग आता जाणवू लागली आहे, या युद्धामुळे एलपीजी गॅल सिलेंडरच्या दरात वाढ तर झालीच आहे, परंतु काळाबाजार वाढला आहे. केंद्र सरकारने देशभरात अत्यावश्यक वस्तू कायदा लागू केला आहे. तरीही काही ठिकाणी काळाबाजार सुरू आहे. राज्यात व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर बंदी घालण्यात आली. अशात घरगुती गॅसचा अवैध वापर केल्याप्रकरणी राज्यात पहिला गुन्हा दाखल झाला.

पंढरपुरमधील सांगोला नाका या ठिकाणी अवैध पद्धतीने घरगुती गॅस सिलेंडर रिक्षात भरून विक्री केली जात असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाला कळाले, त्याप्रमाणे पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत घरगुती गॅसचे ८ तर व्यावसायिक वापराचे ५ सिलेंडर जप्त करण्यात आले, अशी माहिती पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली. या प्रकरणी गणेश बोरीकर यांच्याविरोधात पंढरपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीचा शोध भरारी पथक घेत आहेत.

तसेच व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने राज्यात अनेक ठिकाणी घरगुती गॅस वापराच्या तक्रारी शासनाला प्राप्त होत आहे. त्यानुसार शासनाने पुरवठा विभागाला कारवाईचे आदेश दिले आहे. गोंदियातही हॉटेलमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याच्या तक्रारीनंतर स्थानिक प्रशासनाने कारवाई करुन दोन हॉटेल्समधून ७ घरगुती सिलेंडर जप्त केले आहेत. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका देशाला देखील बसत असून एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा मोठा परिणाम हॉटेल व्यवसायावर होत असून हॉटेल व्यवसायिक घरगुती सिलेंडरचा वापर करत असल्याचं निदर्शनास येत आहे. पुरवठा विभाग गॅसचा पुरेसा साठा असल्याने ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. असे असले तरी गॅस पुरवठादारांनी ग्राहकांना २५ दिवसांनंतर नोंदणी करण्यास सांगितले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

भोंदू खरातने राजकीय ओळखीचा फायदा कशासाठी घेतला का? सीडीआरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Leave a Comment