America Israel- Iran War: जगाचा मोठा व्यापारी आणि तेल मार्ग बंद करण्याचा इशारा हुती बंडखोरांनी दिला, इराणने ही त्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे होर्मुझनंतर ‘बब अल मंदेब’ (Bab Al Mandeb) हा सागरी पॉइंट बंद करण्याचा इशारा दिला आहे. येथून जगाची १२ टक्के तेल आणि व्यापाराची वाहतूक होते. होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतुकीवर इराण टोल वसूल करण्याचा विचार करत आहे. इराणच्या प्रवक्त्याने या विषयी इशारा देतांना मोफत जेवण बंद होणार असे सांगून सूचक इशारा दिला. आता दुसऱ्या सागरी मार्गावर संकटात आहे.
जगासाठी अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग असलेला ‘बब अल मंदेब’ समुद्रधुनी बंद करण्याच्या इशारा हुती बंडखोरांनी दिल्याने अनेक देशांना व्यापारी चिंता सतावत आहे. यमन जवळून जाणारा हा सागरी मार्ग हुतीच्या टप्प्यात येतो, (Red Sea) लाल समुद्रापासून (Indian Ocean) हिंद महासागर 32 किमी (20 मैल) अंतरावर आहे. लाल समुद्रातून जाण्यासाठी ते मुख्य प्रवेशद्वार आहे. जो हिंद महासागराला सुएझ कॅनाल (Suez Canal) मार्गे (Meditarian Sea) भूमध्य समुद्राशी जोडतो. जागतिक तेल आणि व्यापाराची 12 टक्के वाहतूक दररोज या मार्गातून होत असते.
आफ्रिकेच्या जवळून या मार्गाने पोहचण्यासाठी 10 ते 14 दिवस लागतात. हुती बंदखोरानी हा मार्ग बंद करण्याची धमकी दिल्याने तेल आणि व्यापार वाहतुकीस आणखी वेळ जाईल. आणि ते परवडणारे नाही. (Suwz Canal) सुएझ कॅनाल- (Bab Al Mandeb) ‘बब अल मंदेब’ – (hormuz strait) होर्मुज समुद्रधुनी असे हे तीन जगासाठी महत्त्वाचे वाहतुकीचे पॉइंट आहेत. त्यातून सुमारे ३० ते ३५ टक्के जगाचा तेल आणि व्यापार वाहतूक होत असते, त्यामुळे यमनमधील हुती आणि इराणची नजर या मार्गावर आहे. हा आणखी एक चोक पॉइंट बनू शकतो. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. कारण असे झाले तर जगभरात वेगळे संकट तयार होईल. या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टारमर यांनी जगातील महत्त्वाच्या देशांची एक बैठक आयोजित केली. त्यात ६० देशांनी सहभाग घेतला आणि होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याबाबत चर्चा केली. त्यामुळे त्यातून एखादा मार्ग निघेल आणि जगासमोरील ऊर्जा संकट दूर होईल अशी अपेक्षा या बैठकीत अनेक देशांनी व्यक्त केली.










