होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Amalner Crime News गावठी कट्टयातून गोळी सुटून एका तरुणाचा जागीच मृत्यू ; घटनेने अमळनेर हादरले

On: March 28, 2026 1:08 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Crime News: गावठी कट्ट्यातून गोळी सुटून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, या घटनेने खळबळ उडाली असून, गावठी कट्ट्याबाबत माहिती देत असतांच बंदुकीतून गोळी थेट तरुणाला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मयत तरुणाचे नाव सुरेश महाजन असून मित्रासोबत गप्पा मारतांना ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. तो मंडप व्यवसायाशी निगडित होता. याप्रकरणी अमळनेर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने अमळनेर हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. भूषण महाजन आणि अरुण महाजन हे दोघे चांगले मित्र आहे. अरुण हा आपल्या काही मित्रांसोबत माळीवाडा परिसरात गप्पा मारत बसला होता. यावेळी त्याचा मित्र भूषण महाजन त्या थाईकानी आला आणि आपल्याजवळील गावठी कट्ट्याबद्दल माहिती देत होता. माहिती देण्याच्या नादात बंदुकीतून कधी गोळी झाडली गेली हे लक्षात आले नाही, कट्ट्यातून मिसफायर झाल्याने गोळी थेट अरुणच्या छातीत घुसलीआणी अरुण खाली कोसळला.

अरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्याला मृत घोषित केले. या घटनेने परिसर हादरला आहे, या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पथकासह रुग्णालयात धाव घेत याप्रकरणाची माहिती घेतली. रुग्णालयाबाहेर अरुणच्या नातेवाईक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली.

पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवून भूषण महाजन याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात हा घात आहे की अपघात याचा प्राथमिक तपास पोलीस करत आहेत. संशयित भूषण यांच्याकडे गावठी कट्टा कोठून आला, तसेच त्याचे गुहेगारी रिकॉर्ड आहे का याचा हे तपास सुरू आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

Railway To Run Special Trains: खान्देश वासियांनो लक्ष द्या! हटिया, संतरागाछीसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या..

Leave a Comment