Jalgaon News: उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते हटिया आणि एलटीटी ते संतरागाछी दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालविणार आहे. एलटीटी ते हटिया साप्ताहिक विशेष (१८ सेवा)- ट्रेन क्रमांक ०८६१० ही २२ एप्रिल ते १७ जून या कालावधीत एलटीटी येथून दर बुधवारी ०५.०० वाजता सुटेल आणि हटिया येथे दुस-य़ा दिवशी १८.०० वाजता पोहोचेल. खान्देशच्या प्रवाश्यांना ग गाड्यांचा फायदा होणार आहे. मनमाड, चाळीसगाव, पाचोरा आणि भुसावळ याठिकाणी थांबे देण्यात आल्याने सुट्ट्यांमध्ये प्रवाश्यांची गैरसोय टळणार आहे.
ट्रेन क्रमांक ०८६०९ ही हटिया येथून २० एप्रिल ते १५ जून या कालावधीत हटिया येथून दर सोमवारी १६.२० वाजता सुटेल आणि मुंबईला तिस-या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगांव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राऊरकेला हे थांबे असणार आहे
एलटीटी ते संतरागाछी साप्ताहिक विशेष (२६ सेवा)- ट्रेन क्रमांक ०१००१ गाडी २१ एप्रिल ते १४ जुलै या कालावधीत एलटीटी येथून दर मंगळवारी २०.१५ वाजता सुटेल. तर ट्रेन क्रमांक ०१००२ ही २३ एप्रिल ते १६ जुलै या कालावधीत संतरागाछी येथून दर गुरुवारी १५.५० वाजता सुटेल आणि मुंबईला दुस-या दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर आदी थांबे असणार आहे. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते, या गाड्या गर्दीच्या काळात सुरू होणार असल्याने प्रवाश्याना खास करून खान्देश भागातील नागरिकांना फायदेशीर ठरणार आहे.






