Nashik News:नाशिक शहरात विविध ठिकाणी पाण्याच्या पाईप लाईन टाकणे आणि दुरुस्ती, वॉल टाकणे, लिकेज दुरुस्त करणे आणि फ्लो मीटर बसविणे आदी अत्यावश्यक कामे सुरू आहे. त्यामुळे शहरात काही ठिकाणी पाणी पुरवठा होणार नाही, संपुर्ण नाशिक शहरात पाणी पुरवठा विषयक तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मोठया स्वरुपाची मके सुरू आहेत तसेच स्मार्ट सिटी मार्फत काही अत्यावशक कामे करण्यासाठी शनिवार दि.०४ व रविवार दि.०५ एप्रिल २०२६ रोजी दोन दिवसांचा शट डाऊन घेण्याचे नियोजित असून या दोन दिवस संपूर्ण नाशिक शहरात ३६ ते ४८ तास पाणी पुरवठा होणार नाही, तरी खालील नमूद परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. दि. ६ एप्रिल रोजी सकाळी कमी दाबाने पाणी पूरवठा होईल, तरी शहरातील सर्व नागरीकांनी मनपास सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी व पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
संपुर्ण नाशिक शहरात दोन दिवसांचा शट डाऊन कालावधीमध्ये विभागनिहाय खालीलप्रमाणे कामे करण्यात येणार असुन मक्तेदार व कामाचा कालावधी देण्यात आलेला आहे.
नाशिक पुर्व विभाग
१) नाशिक पुर्व प्र.क्र. ३० मधील कलानगर जलकुंभ भरणारी ५०० मी.मी. व्यासाची गुरुत्व वाहीनी मुख्य ७०० मी.मी. व्यासाच्या गुरुत्व वाहीनीला जोडणे मक्तेदार मेघ कंस्ट्रुवेल कालावधी अंदाजे २४ तास
२) गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्र लक्ष्मी सिव्हील इंजिनिअर
नाशिक पश्चिम विभाग
१) त्र्यंबक रोड एबीबी सर्कल येथे मोठया प्रमाणत असलेले ३०० मी.मी. व्यासाच्या पाईपलाईन लिकेजचे काम बंद करणे
२) पी ॲन्ड टी कॉलनी येथे २०० मी.मी. व्यासाचा एअर व्हॉल बदलणे. मक्तेदार श्री सोमनाथ सोनजे
वरील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी अंदाजे १२ तास लागतील
नाशिकरोड विभाग
तसेच गांधीनगर व नाशिक रोड जलशुध्दीकरण केंद्राची कामे खालीलप्रमाणे
१) नाशिक रोड जलशुध्दीकरण केंद्र येथे रॉ वॉटर ९०० मी.मी.एम लाईनचे क्रॉस कनेक्शन करणे. मक्तेदार श्री पी. एल. आडके
२) गांधीनगर जलशुध्दीकरण येथे रॉ वॉटर ९०० मी.मी.लाईन १२०० मी.मी. पाईपलाईनवर क्रॉस कनेक्शन करणे. मक्तेदार श्री. पी. एल. आडके
३) गांधीनगर जलकुंभाजवळ पंपाची इनलेट ७०० मी.मी. व्यासाच्या पाईपलाईन वर ४५० मी.मी. व्यासाच्या पाईपलाईनचे क्रॉस कनेक्शन करणे. मक्तेदार श्री पी. एल. आडके तसेच सदर ७०० मी.मी. व्यासाच्या पंपाच्या पाईपलाईनवर स्मार्ट सिटी मार्फत फ्लो मिटर बसविणे.
वरील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी अंदाजे ३६ तास लागतील
पंचवटी विभाग
१) पेठरोड सप्तरंग बिल्डींगजवळ मखमलाबाद येथील उर्ध्ववाहीनीवर ६०० मी.मी. X ६०० मी.मी. व्यासाचे तवली डोंगर उर्ध्ववाहीनीचे क्रॉस कनेक्शन करणे. मक्तेदार मे. आशिष कंन्स्ट्रक्शन, नाशिक
२) पेठरोड आर.टी.ओ ऑफीससमोर समर्थ नगर नवीन जलकुंभाचे उर्ध्ववाहीनीचे करणे ६०० मी.मी. X ६०० मी.मी. व्यासाचे क्रॉस कनेक्शन मक्तेदार मे. मेघ कंस्ट्रुवेल, नाशिक
३) पंचवटी प्रभाग क्र. ०६ कुसुमाग्रज गार्डन येथे गुरुत्ववाहिनीवरील लिकेज बंद करणे मक्तेदार श्री.संजय व्ही सुर्यवंशी
वरील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कालावधी अंदाजे १८ तास लागतील
सातपुर विभाग
१) सातपुर विभागातील १२०० मी.मी. व्यासाची पी.एस.सी. कडेपठार अनुविषांत अपार्टमेंट जवळ पाईपलाईन गळती बंद करणे. मक्तेदार संजय सोनजे
२) सातपुर विभागातील महेंद्र मटेरीअल गेट समोर १२०० मी.मी. व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईन गळती बंद करणे. मक्तेदार संजय सोनजे
३) सातपुर विभागातील बळवंत नगर जलकुंभाजवळ ओमकार तिरुमाला बिल्डींग समोरील १२०० मी.मी. व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईन गळती बंद करणे. मक्तेदार संजय सोनजे
४) सातपुर विभागातील कॅनल लगत पाटील फार्म हाऊस समोर १२०० मी.मी. व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईन गळती बंद करणे. मक्तेदार संजय सोनजे
५) सातपुर विभागातील कार्बन नाका टपरी झोन जवळ भिंती लगत ५०० मी.मी. व्यासाची पी.एस.सी. पाईपलाईन गळती बंद करणे. मक्तेदार संजय सोनजे
वरील सर्व कामे पुर्ण करणेसाठी अंदाजे १२ तास लागतील.
नविन नाशिक विभाग
१) नविन नाशिक प्र.क्र.२७ महाराजा हॉटल येथील १००० मी.मी.पीएससी लाईन चे लीकेज बंद करणे मक्तेदार पी आर चौधरी
२) नविन नाशिक प्र. क्र. २७ मधील पाथरडी फाटा वरील ३ नं टाकी वर आउटलेट वाल्व टाकणे – मक्तेदार – संजय सोनजे
३) नविन नाशिक प्र. क्र. २५ मधील इंद्रनगरी जलकुंभ येथे क्रॉस कनेक्शन करून ४५० मी.मी. व्यासाचा वाल्व टाकणे.मक्तेदार – आनंद कंस्ट्रुवेल
४) नविन नाशिक प्र. क्र. २४ मधील लेखानगर स्टेट बँक च्या मागे टाकी भरण्याच्या साडेचारशे मी.मी. व्यासाची पाईपलाईन लिकेज काढणे. मक्तेदार -कुणाल शिंदे
५) नविन नाशिक प्र. क्र. २४ गोविंद नगर जॉगिंग ट्रॅक पी एस सी लाईनवरील लिकेज काढणे.मक्तेदार -कुणाल शिंदे
६) नविन नाशिक प्र. क्र. २४ गोविंद नगर बोगद्या जवळील ६०० मी.मी. व्यासाची टाकी भरण्याची मेन पाईपलाईन लिकेज काढणे. मक्तेदार-कुणाल शिंदे
७) नविन नाशिक प्र. क्र. ३१ मधील भवानी माता -२ टाकी भरण्याची पाईपलाईन वरील लिकेज काढणे.मक्तेदार-सोमनाथ सोनजे
८) नविन नाशिक प्र. क्र. २५ मधील रायझिंग मेन लाईन व्हॉल दुरूस्ती करणे मक्तेदार-कुणाल शिंदे
९) नविन नाशिक प्र क्र २७ मधील मारुती संकुल पम्प येथे एन आर वी वॉल्व चे लीकेज काढणे. मक्तेदार राजेंद्र माळी वेळ -२४ तास
वरील सर्वे कामास अंदाजे १८ तास लागणार आहे.
१५ वा वित्त आयोगाचा निधी
१) गंगापुर धरण ते बारा बंगला १८०० मी.मी. व्यासाच्या पाईपलाईन टाकणे या कामाअंतर्गत १२०० मी.मी. व्यासाची दोन पी.एस.सी. पाईपलाईन ला एस.एस. पाईपलाईन Blue Ocean संत कबीर नगर येथे क्रॉसिग करणे.
२) गंगापुर डॅम हेडवर्कस येथे बी.पी.टी. च्या जुन्या व नविन १७०० मी.मी. व्यासाचे क्रॉस कनेक्शन करणे
वरील दोनही कामे पुर्ण करणेसाठी अंदाजे ४८ तास लागतील.







