होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Census 2027 : आता ‘लिव्ह इन’चे जोडपे विवाहितांच्या यादीत येणार, देशात जनगणनेला सुरुवात

On: April 1, 2026 12:19 PM
Follow Us:
---Advertisement---

Census 2027 : ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या जोडप्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जनगणनेचा पहिला टप्पा आज म्हणजे बुधवार, १ एप्रिलपासून सुरू झाला आहे. त्यानुसार, आता ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या जोडप्यांचा समावेश विवाहितांच्या यादीत केला जाणार आहे. जनगणनेचा पहिला टप्पा एप्रिलमध्येच पूर्ण होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लोकसंख्या जनगणना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात जात जनगणना केली जाणार आहे.

रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी पत्रकार परिषदेत, राष्ट्रीय जनगणनेच्या दुहेरी रचनेबद्दल सविस्तर माहिती दिली. पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि गणना, घरांची स्थिती, उपलब्ध सुविधा आणि कौटुंबिक मालमत्ता यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. तर ही माहिती दुसऱ्या टप्प्यासाठी पाया तयार करणार असल्याचे म्हटले आहे.

पहिल्या टप्प्याचे असे आहे वेळापत्रक जनगणना १ एप्रिल रोजी स्व-गणनेने सुरू होईल. त्यानंतर १६ एप्रिलपासून नियुक्त गणकांद्वारे घरोघरी जाऊन लोकसंख्या गणना मोहीम राबवली जाईल. पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर २०२६ दरम्यान पूर्ण होणे अपेक्षित आहे. २०२७ च्या जनगणनेत ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, ७८४ जिल्हे, ५,१२७ वैधानिक शहरे, ४,५८० जनगणना शहरे आणि ६ लाख ३९ हजार ९०२ गावांचा समावेश असेल.

 

दुसऱ्या टप्प्याचे यावर असेल लक्ष ?

जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात स्थलांतर आणि प्रजनन दरांसह लोकसंख्या शास्त्रीय, सामाजिक-सांस्कृतिक आणि आर्थिक मापदंडांवर माहिती मिळते. मृत्युंजय कुमार म्हणाले, ‘जनगणनेच्या दुसऱ्या टप्यात जात जनगणना केली जाईल. जनगणना हा केंद्रशासित प्रदेशाचा विषय असून भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचीमध्ये तो ६९ व्या क्रमांकावर सूचीबद्ध आहे. गेल्या वर्षी १६ जून रोजी, केंद्र सरकारने २०२७ ची जनगणना घेण्याची एक अधिसूचना जारी केली. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारताच्या रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाने जारी केलेल्या या अधिसूचनेत, देशाच्या बहुतांश भागांसाठी जनगणनेची संदर्भतारीख १ मार्च, २०२७ अशी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, लडाख आणि जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडच्या काही भागांसह बर्फाच्छादित प्रदेशांसाठी ही तारीख १ ऑक्टोबर, २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे असे म्हटले गेले आहे.

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्यांना विवाहित जोडपे मानणार

जर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारे दोघे परस्परांना कायमस्वरूपी आपले मानत असतील तर जनगणनेदरम्यान त्यांना विवाहित जोडपे म्हणून गणले जाणार आहे. याबाबत भारतातील जनगणनेसाठीच्या स्वयं-गणना पोर्टलवरील वारंवार विचारल्या जाणाऱ्या (एफएक्यू) प्रश्नांतील हा एक प्रश्न आहे. लोकसंख्या-जनगणना, घरनोंदणी आणि गृहगणनेच्या पहिल्या टप्प्यात रहिवाशांना विचारले जाणारे ३३ प्रश्न अधिसूचित करून ही यादी १६ व्या जनगणनेदरम्यान स्वयं-गणना पर्याय निवडणाऱ्यांसाठी पोर्टलवर टाकली आहे. या प्रश्नांची उत्तरे लोकांना सहजपणे देण्यासाठी पोर्टलवर एफएक्यूंची यादी प्रसिद्ध केली जाते.

बंगालमध्ये अधिसूचना जारी नाही

पश्चिम बंगाल सरकारने अद्याप जनगणनेची अधिसूचना का प्रसिद्ध केली नाही, असे विचारले असता ते म्हणाले, पश्चिम बंगालने जनगणनेची अधिसूचना प्रसिद्ध केलेली नाही. आम्ही हा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला आहे. आम्हाला आशा आहे की राज्य सरकार अधिसूचना प्रसिद्ध करेल, जी एक कायदेशीर आवश्यकता आहे. पहिल्या टप्प्यासाठी आमच्याकडे सप्टेंबर २०२६ पर्यंत वेळ आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment