होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Commercial Gas Cylinders News:व्यावसायिक-उद्योगांना दिलासा: व्यवसायिक गॅस सिलेंडरबाबत केंद्राने ‘हा’ मोठा घेतला निर्णय

On: March 28, 2026 4:57 PM
Follow Us:
---Advertisement---

Commercial Gas Cylinders News: घरगुती एलपीजी सिलिंडरचे वितरण नेहमीप्रमाणे सुरू आहे, मात्र व्यावसायिक सिलेंडरचा पूरवठा सुरळीत होण्यास अडचण येत आहे. भारत सरकारने व्यावसायिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सरकारने शुक्रवारी एक आदेश काढून व्यावसायिक एलपीजीच्या अतिरिक्त 20% वाटपास मंजुरी दिली आहे, मागील आठवड्यात सरकारने ग्राहकांसाठी व्यावसायिक एलपीजीचा अंशतः (20%) पुरवठा आधीच पूर्ववत केला होता, ज्यामध्ये पीएनजी सुधारणांशी निगडित अतिरिक्त 10% वाटपाचा समावेश होता.आता त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. हे प्रमाण संकटपूर्व पातळीच्या 70% वर पोहोचले आहे. उद्योगांना यांचा फायदा होणार आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली.

भारत सरकारने दि. 21.मार्च रोजीच्या पत्राद्वारे आणखी 20% वाटपास परवानगी दिली, ज्यामुळे एकूण वाटप 50% झाले आहे. यामध्ये रेस्टॉरंट्स, धाबे, हॉटेल्स, औद्योगिक कॅन्टीन, अन्न प्रक्रिया/ डेअरी, राज्य सरकार किंवा स्थानिक संस्थांद्वारे चालवली जाणारी अनुदानित कॅन्टीन्स, सामुदायिक स्वयंपाकघर यांचा समावेश आहे, तसेच स्थलांतरित मजुरांसाठी 5 किलो एफटीएल देण्याचा समावेश आहे.

भारत सरकारने 27.मार्च शुक्रवारी पत्राद्वारे व्यावसायिक एलपीजीच्या अतिरिक्त 20% वाटपास मंजुरी दिली आहे, ज्यामुळे एकूण वाटप संकटपूर्व पातळीच्या 70% वर पोहोचले आहे. यामध्ये पोलाद, ऑटोमोबाईल, कापड, डाय , रसायने आणि प्लॅस्टिक उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्येही, प्रक्रिया उद्योग किंवा ज्यांना विशेष उष्मानिर्मिती उद्देशांसाठी एलपीजी आवश्यक आहे आणि ज्या ठिकाणी नैसर्गिक वायूचा वापर शक्य नाही, त्यांना प्राधान्य दिले जाईल. काल (शुक्रवारी) 40,000 पेक्षा जास्त 5 किलो ‘फ्री ट्रेड एलपीजी’ सिलिंडरची विक्री झाली.पेट्रोलियम मंत्रालयाने सांगितले

28 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी बिगर-घरगुती एलपीजीसाठी वाटप आदेश जारी केले आहेत, तर उर्वरित भागात सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या पुरवठा करत आहेत.14 मार्च 2026 पासून आतापर्यंत सुमारे 29,656 मेट्रिक टन व्यावसायिक एलपीजीची उचल करण्यात आली आहे. त्यामुळे आता व्यावसायीक आणि औद्योगिक सिलेंडर मिळून व्यवसाय सुरळीत चालवण्यास मदत होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment