Jalgaon News: (All India Congress Party) काँगेस अद्याप विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर आलेली दिसत नाही, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मरगळ कायम आहे. पक्षांतर्गत उपक्रमात कार्यकर्ते सहभागी होत नसल्याचे काँग्रेस नेत्यांना लक्षात आले आहे. पक्षातर्फे आता मरगळ झटकून कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहे. पक्षाला ऊर्जितावस्था देण्यासाठी मरगळ झटकून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे आणि नवीन पदाधिकारी, कार्यकर्ते जोडले जावेत, या उद्देशाने काँग्रेसतर्फे जिल्ह्यात ३ ते ८ एप्रिल दरम्यान संघटन सृजन अभियान राबविले जात आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार (Pradip Pawar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यासाठी ऑल इंडिया काँग्रेस कमिटी नवी दिल्ली यांच्याकडून जळगावमध्ये पक्ष निरीक्षक पाठवत आहे. ते स्वतः पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देता आहे. त्यासाठी ते पाच, सहा दिवस अभियान राबवून संघटनात्मक महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत. जळगाव ग्रामीण, जळगाव शहर व रावेर जिल्ह्यासाठी ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीतर्फे निरीक्षक म्हणून प्रमोदकुमार यांची निवड झाली आहे. जळगाव ग्रामीणसाठी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जळगाव शहरसाठी श्यामकांत तायडे यांची निवड आहे. तर जिल्हा व शहर निरीक्षक म्हणून साजीद पठाण, के. सी. पाडवी, अरिझ बेग, हरिष रावल यांची निवड झाली आहे
महानगर काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत तायडे, सरचिटणीस जमील शेख, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, चंद्रकांत पाटील ज्ञानेश्वर कोळी यांच्या नेतृत्वात आखिल भारतीय काँग्रेस कमिटीने संघटनात्मक नवीन प्रणाली स्वीकारली असून, या प्रणालीला ‘संघटन सुजन अभियान’ असे नाव देण्यात आले आहे.
नव्या पदाधिकाऱ्यांची निवड
संबंधित निरीक्षक रावेर जिल्हा काँग्रेस समितीची नवीन कार्यकारीणी घोषीत करतील. त्यात अध्यक्ष व इतर पदाधिकारी निवडले जातील. जळगाव जिल्ह्यात काँग्रेसचे दोन जिल्हाध्यक्ष असणार आहे. असतील. त्यात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष व रावेर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष असणार आहे.
जळगाव काँग्रेस जिल्हहाध्यक्ष म्हणून प्रदीप पवार व जळगाव शहर काँग्रेस अध्यक्ष म्हणून शामकांत तायडे आहेत. यांना पाच वर्ष पूर्ण झाल्याने त्याजागी नवीन अध्यक्षांची निवड होइल, असे सांगण्यात आले. कॉंग्रेसची बैठक शुक्रवारी (ता.३) सकाळी दहाला काँग्रेसची शहरात निरीक्षकांची बैठक होणार आहे.






