होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

कुंभमेळ्यात देवळाली- ओढा रेल्वे स्थानकामुळे होणार गर्दीचे व्यवस्थापन

On: April 5, 2026 12:24 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी विभागातील वरिष्ठ शाखा अधिका-यांसह नाशिक रोड, देवळाली आणि ओढा या रेल्वे स्थानकांची पाहणी करून कुंभमेळा विकास कामाचा आढावा घेतला. तसेच राज्याचे मुख्य सचिवांनी रेल्वेच्या कामांची पाहणी केली. देवळाली आणि ओढा स्थानकामुळे नाशिकरोड स्थांनकावरील गर्दीचा ताण कमी करून तो दोन स्थानकात विभागाला जाणार आहे. त्यामुळे एकाच वेळी येणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन होणार आहे.

कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री, तसेच रेल्वे व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देवळाली, नाशिक रोड व ओढा येथे भाविकांसाठी विकास कामे सुरू आहेत. या कामांची सविस्तर पाहणी करून अग्रवाल यांनी कामांची प्रगती, गुणवत्ता व वेळेत पूर्णत्वाबाबत आढावा घेतला. कुंभमेळ्यात वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून प्लॅटफॉर्म विस्तार, प्रवासी सुविधा उन्नतीकरण, सुरक्षा व्यवस्था तसेच स्थानक परिसरातील वाहतूक नियोजन या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. संबंधित अधिका-यांशी चर्चा करून कामांची गती वाढविणे, समन्वय राखणे व सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सूचना अग्रवाल यांनी केल्या.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकास कामांची राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी देखील सविस्तर पाहणी केली होती. त्यांनी विविध प्रकल्पांची प्रगती, गुणवत्ता व वेळापत्रकाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या.

रेल्वे प्रशासन प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असून, कुंभमेळ्याच्या कालावधीत सुरळीत, सुरक्षित रेल्वे सेवा उपलब्ध राहतील यासाठी नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. रेल्वे प्रशासन व राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणी जलद गतीने सुरू असून, यात्रेकरूंना अधिक सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असल्याचे रेल्वेने सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Railway Division Of Bhusaval: भुसावळ विभागाने या सेक्शनवरील वेगमर्यादा हटविली; वेगवान रेल्वे वाहतुकीला चालना!

जेष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप अवलस्थानी- आ. सुरेश भोळे; भाजपचा 46 वा स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेने पटकावला चषक! ‘मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६’

लोकसेवेतून जिवंत ठेवली मानवतेची ज्योत! कै. ॲड उज्वला गायकवाड यांना अनोखी श्रद्धांजली!

LPG Shortage: एलपीजी वितरण ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ प्रमाणेच होणार! या प्रणालीचा वापर 90% पर्यंत वाढला..

घरपट्टी- पाणीपट्टी इंडेक्स क्रमांक बंदची अफवा! मनपाने केला सायबर पोलिसात गुन्हा दाखल..

Leave a Comment