होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

देवेंद्र फडणवीस यांची खरात प्रकरणी महत्वाची प्रतिक्रिया; या प्रकरणातील सहभागी असलेल्यांवर कारवाई होणारच, माझ्याकडे सर्व  पुरावे!

On: March 22, 2026 2:45 PM
Follow Us:
---Advertisement---

CM Fadanvis Statement on Ashok  Khara: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याने आपल्याकडे दैवीशक्ती असल्याचे सांगून अनेक महिलांना नादी लावले आणि त्यांचे लैगिक शोषण केले. संपूर्ण देशभर हे प्रकरण गाजत असून याची  मुख्यमंत्र्यांनी ही गंभीर दाखल घातली असून याप्रकरणातील मुख्य सूत्रधार अशोक खरातला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी दिले. नागपूरमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सामाजिक दबावामुळे पिढीत महिला येत समोर नाहीत. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देऊन विश्वासात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, काहीप्रमाणात महिला समोर येत असल्याने या प्रकरणाचा तपास वरिष्ठ स्तरावर सुरु केला आहे. मी स्वत: राज्याच्या पोलीस महासंचालकांना या प्रकरणावर लक्ष देण्यास सांगितले आहे. त्यासाठी विशेष तपास पथकाची तयारी केली आहे, या प्रकरणात जे जे दोषी आढळतील त्यांना सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. काही जण या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले, तरी हे प्रकरण आम्हीच समोर आणल्याने या प्रकरणाचे सर्व पुरावे माझ्याकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात सहभागी असलेल्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. पण काहीजण या सगळ्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणाजवळ काही पुरावे असतील तर ते आणून द्यावे, विनाकारण या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, असा इशारा फडणवीस यांनी विरोधकांना दिला. नाशिक पोलीस आयुक्त आणि एसआयटी मिळून या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणात दोषी असलेल्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. पण काहीजण या सगळ्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे, राजकीय रंग देऊ नये, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

भोंदू खरातने राजकीय ओळखीचा फायदा कशासाठी घेतला का? सीडीआरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Leave a Comment