होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Ashok Kharat Case: अशोक खरातला मदत करणारे डॉक्टर ही गोत्यात?; काही डॉक्टर खरातच्या संपर्कात!

On: March 31, 2026 4:52 PM
Follow Us:
---Advertisement---

Ashok kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे, काही सरकारी अधिकारी, राजकिय नेते यांच्यासह खरातच्या संपर्कात काही नाशिकचे डॉक्टर ही असल्याचे एसआयटीच्या तपासात समोर आल्याचे सूत्रांची माहिती आहे. गेल्या काही तासांपासून विशेष तपास पथकाकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाची माहिती उघड होत आहे, यादृष्टीने एसआयटीच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागली आहे. अशोक खरात याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले होते. मात्र, यापैकी एकही महिला गर्भवती झाली नाही. त्यासाठी अशोक खरात हा एखादे गर्भनिरोधक औषध वापरत होता का या दिशेने ही पोलीस तपास करत आहे. खरातची पोलीस कोठडी संपत असल्याने एसआयटी पथक कसून चौकशी करत आहे, त्यात धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे. तसेच खरात वेगवेगळ्या कामासाठी तीन ते चार मोबाइल क्रमांक वापरत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

खरात हा इतका धूर्त होता तो वेगवेगळे मोबाईल नंबर वापरून लोकांशी संपर्क साधत असे, तो सर्वसामान्य लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी एक नंबर, तर व्हीआयपी आणि आर्थिक व्यवहारासाठी वेगळे मोबाईल वापरत होता, तसेच महिलांसाठी वेगळा नंबर असे तीन ते चार मोबाईल क्रमांक वापरत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या या मोबाइलला मधून धक्कादायक माहिती मिळण्याची शक्यता आहे. एसआयटीच्या पथकाकडून डेटा रिकव्हर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

दरम्यान अशोक खरातला एक एप्रिल पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची पोलीस कोठडी बुधवारी संपणार असून त्याला पुन्हा न्यायालयात हजार करण्यात येईल. त्यावेळी कोणकोणते धक्केदायक खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, दरम्यान एसआयटीकडून सुरु असलेली चौकशी आता अंतिम टप्प्यात असून त्यात कोणती माहिती समोर येते याबाबत खरातशी संपर्कात असलेल्या लोकांना घाम फूटला आहे. आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी पथकाकडून काही तास अशोक खरात याची कसून चौकशी सुरू आहे, अशोक खरात याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले आहे, मात्र, यापैकी एकही महिला गर्भवती नसून अशोक खरात हा एखादे गर्भनिरोधक औषध (Contraceptive pills ) वापरत असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत असल्याचे सूत्रांची माहिती.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

Railway To Run Special Trains: खान्देश वासियांनो लक्ष द्या! हटिया, संतरागाछीसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या..

Leave a Comment