America Iarael Iran war Update: अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प (Donald Trump) यांनी शांती वार्ता चालू असल्याचे सांगितले आहे, मात्र इराणने ट्रम्प यांचे वक्तव्य खोडून काढत अशी कोणतीच वार्ता सुरू नसून जी काही चर्चा आहे, ती विविध चॅनलच्या माध्यमात होत आहे. असे एका वृत्तवाहीनीशी बोलतांना स्पष्ट केलं. तसेच कतार पुन्हा एकदा आपण अमेरीका आणि इराण मध्ये मध्यस्था करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. याआधी अमेरिका आणि इराणमध्ये पाकिस्तानने मध्यस्था करत असल्याचे सांगितले होते. मात्र इराणने अविश्वासार्यतेचा मुद्दा उपस्थित केला होता. इस्रायल देखील ते पसंद नव्हते, आता कतार पुन्हा एकदा समेट घडवून आणण्यासाठी आणि युद्ध थांबविण्यासाठी तयार झाला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (Donald Trump) यांनी इराण कॅम्पेन दोन ते तीन आठवड्यात समाप्त करण्यास सांगितले आहे, देश इराणवर आपला हल्ला दोन ते तीन आठवड्यात संपवेल, असे सांगून त्याचे कारण इराणमध्ये आधीच शासन बदलले आहे, कट्टरवादाला खतपाणी घालणारे सर्व नेते संपले आहे. त्यामुळे आपल्याला जे हवं आहे ते आपण मिळविले आहे. दरम्यान इराण सोबत चर्चा ही चालू असल्याचे त्यांनी सांगितले, दरम्यान इराणचे परराष्ट्रीय मंत्री अरागाची यांची अमेरिका आणि इराणमध्ये कोणीच चर्चा झाली नाही. चर्चा वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमांतून होत आहे असे स्पष्ट केले, युद्ध थांबविण्याची कोणतीच चर्चा झाली नसल्याचे त्यांनी अलजजिरा वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. (Iran)
यूएन एड प्रमुखाचा इशारा
दक्षिण लेबनॉन मध्ये बफर झोन तयार करत असल्याचे वृत्त आतंरराष्ट्रीय माध्यमांनी दिले आहे. इस्रायलचे सैन्य या ठिकाणी सेफ झोन तयार कर आहे, युएनच संयुक्त राष्ट्राचे याबाबत मदत विभागाचे प्रमुखांनी दक्षिण लेबनॉन मधील बफर झोन करू नका असा इशारा दिला आहे. दरम्यान युकेचे पंतप्रधान किर स्टारमर (Keir Starmer) पश्चिम आशियातील हे युद्ध ब्रिटनच्या भविष्यावर प्रभाव टाकू शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी हॉर्मुझ सामुद्रधूनीवर मार्ग काढण्यासाठी त्यांनी ३५ देशांना चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे.
खराझी यांच्या घरावरील हल्ल्याने तणाव
दरम्यान इस्रायलने इराणचे परदेशी संबंधांवर धोरणात्मक परिषद प्रमुख कमाल खराझी (Kamal Kharaji) यांच्या घरावर हल्ला केला होता तो हल्ला त्यांनी गांभीर्याने घेतला असल्याचे इराणच्या माध्यमांनी सांगितले आहे. त्या हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील काही जण मारले गेले होते. इराणच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठावर केलेल्या हल्ल्यानंतर हा हा हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या विरोधात इराणने इस्रायलवर मिसाईल हल्ले वाढवले आहे. तेल अविववर इराणचे हल्ले सुरूच आहे. इस्रायल आणि इराणला या दोघांनाही युद्धाची झळ पोहोचत आहे.










