होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

गॅस तुटवड्यामुळे खाद्यपदार्थाना दरवाढीचा फटका; गरीबाच्या आवडीचे ‘हे’ जेवण झाले महाग?

On: March 20, 2026 2:01 PM
Follow Us:
---Advertisement---

Food Prices Hike:  गॅस तुटवड्याने आधीच नागरिक आणि व्यावसायिक हैराण झाले आता सामान्य जनता ही त्रस्त झाली आहे, गरिबांसाठी झटपट आणि जागो जागी मिळणारे खाद्यपदार्थ ही महागले आहे. सामान्यांचा आवडीचा वडापाव भजी, पोहे यांच्या दारात १० ते १५ टक्क्याची वाढ झाली. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला झळ बसली आहे. मेस चालकांनाही मेस चालवणे कठीण झाले आहे. त्यांना देखील महागाईचा फटका बसला आहे.

गॅस पुरवठ्याबाबत शासनाने नियमावली बनवली आहे, त्यानुसार गॅस सिलेंडरदिले जात आहे.  खाद्य पदार्थाच्या किंमती वाढल्या असून गरिबांचे आवडीचे खाद्यपदार्थ ही महाग झाल्याने खिशाला अतिरिक्त झळ बसली असून सामान्य माणसाची आर्थिक गणितं बिघडली आहे. वडापाव, भजे आणि सॅन्डविच आदी खाद्यपदार्थ हे सामान्य जनतेला ज्यादा पैसे देऊन पोटाची भूख भागवावी लागत आहे. दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेला आणि सर्वसामान्यांचा पोटभरणारा वडापाव आणि इतर पदार्थ महाग झाल्याने सामन्यांचे खिशाचे वजन घातले आहे.

घरगुती गॅस वगळता ठराविक आस्थापनांना गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरु आहे. त्यासाठी शासनाच्या अन्न नागरी पूरवठा विभागाने सिलेंडर वितरणासाठी प्रमाणीकरण केले आहे. त्यानुसार गॅस वितरण सुरु आहे. व्यावसायीक गॅसचा पुरवठा वेळेवर होता नसल्याने हॉटेल आणि छोटे छोटे खाद्य स्टॉल, मेस चालकांची मोठी अडचण झाली आहे. त्यांना गॅस सिलेंडर मिळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. जळगावच्या हॉटेल चालकाने आम्ही, भाजी पोळी ४० रुपयात द्यायचो वेळेत सिलेंडर मिळत नसल्याने दरही १० ते १५ टक्क्याने वाढवावे लागले आहे.

राज्यात इतर ठिकाणी ही खाद्य पदार्थांच्या किमती वाढली आहेत, नास्त्याच्या वडापावचे दर १० ते १५ टक्क्याने वाढले आहे. अशीच युद्धजन्य परिस्थिती कायम राहली तर सर्वसामान्यांचे थाळीतील अनेक परवडणारे पदार्थ गायब होतील, हॉटेल चालकांना आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आपले व्यवसाय बंद करण्याची वेळा येईल, काही ठिकाणी हे चित्र दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Railway Division Of Bhusaval: भुसावळ विभागाने या सेक्शनवरील वेगमर्यादा हटविली; वेगवान रेल्वे वाहतुकीला चालना!

जेष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप अवलस्थानी- आ. सुरेश भोळे; भाजपचा 46 वा स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेने पटकावला चषक! ‘मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६’

लोकसेवेतून जिवंत ठेवली मानवतेची ज्योत! कै. ॲड उज्वला गायकवाड यांना अनोखी श्रद्धांजली!

LPG Shortage: एलपीजी वितरण ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ प्रमाणेच होणार! या प्रणालीचा वापर 90% पर्यंत वाढला..

घरपट्टी- पाणीपट्टी इंडेक्स क्रमांक बंदची अफवा! मनपाने केला सायबर पोलिसात गुन्हा दाखल..

Leave a Comment