Fraudster Kharat Case: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रोज नवे नवे खुलासे होता असतानाच, आज पोलीस कोठडी संपल्याने त्याला नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजार करण्यात आले होते, न्यायालयाने खरात यास १ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खरात तपासात सहकार्य करत नसल्याने सरकारी पक्षाने पोलीस कोठडी वाढून देण्याची मागणी न्यायालयाकडे केली, न्यायालयाने पुन्हा तीन दिवस पोलीस कोठडीत सुनावली आहे.
संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या भोंदूबाबा खरातला कठोर शिक्षा व्हावी,असे या प्रकरणातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांची भावना आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या लिंगपिसाट खरातच्या विरोधात पीडित तक्रारदार हळूहळू पुढे येत आहेत, याप्रकरणाची चौकशी एसआयटीकडे असल्याने तपास अधिकारी खरातचे कोण कोणाशी संबंध आहेत. त्याचा तपास करत आहेत, या प्रकरणात महसूल विभागातील काही अधिकारी ही संपर्कात होते, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे असे महसूल मंत्र्यानी स्पष्ट केले आहे.
दरम्यान या प्रकरणाचा तपास करतांना खरातचे कोणा कोणाचे संबंध आहे, त्याचे साथीदार कोण आहे याचा तपास करायचा असून अद्याप चौकशीत खरात हा सहकार्य करत नसल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले. त्यामुळे खरातची आणखी तीन दिवस पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली, आरोपीच्या वकिलांनी त्याला विरोध केला,तीच तीच माहिती न्यायालयात दिली जात असलयाचे सांगून पोलीस कोठडीला विरोध केला. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत खरात याची १ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने माध्यमांशी बोलतांना खरातचे काम हे अत्यंत समाजविघात आहे. तपास अर्धवट असलल्याने खरातच्या पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे सांगितले.






