होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Gold Silver Rate : घसरणीनंतर सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची वाढ, चांदी 20 हजारांनी वधरली

On: March 25, 2026 1:49 PM
Follow Us:
---Advertisement---

Gold Rate : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होताच सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा तेजी सुरु झाली आहे. आखाती देशात सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी घसरण सध्या पाहवयास मिळत आहे. या पार्श्वभुमीवर गेल्या ९ दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु होती. अखेर सोने आणि चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे सातत्यानं सोन्याचे दर 165000 हजारांवरुन 30 हजारांनी कमी होत 1 लाख 35 हजार रुपयांवर आले होते. आता संघर्ष कमी झाल्यानं सोने आणि चांदीचे दर पुन्हा वाढले आहे.

अमेरिका-इराण युद्धाची तीव्रता कमी होण्याची चिन्हे दिसताच सोने चांदी दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल सोन्याचे भाव जीएसटी शिवाय 1 लाख 40 हजार 500 रुपयांवर होते. तर आज भाव पाच हजार रुपयांनी वाढून ते 1 लाख 45 हजार 500 वर जाऊन पोहोचले आहेत. तर, चांदीच्या दरात ही 20 हजाराची वाढ होत भाव 2 लाख 20 हजारांवरुन 2 लाख 40 हजारांवर पोहोचले आहेत.

यासह युद्धातील तणाव कमी झाल्यानं डॉलर निर्देशांक कमजोर झाला होता, क्रूड ऑईलचे दर कमी झालेत. एका दिवसात सोन्याचे दर 5000 रुपयांनी वाढले. युद्ध पूर्णपणे थांबले तर सोन्याचे दर 1 लाख 65 हजार ते 1 लाख 70 हजारांवर जातील, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. तर दुसरीकडे युद्ध सुरु राहीलं तर सोन्याचे दर 1 लाख 25 हजारांपर्यंत येऊ शकतात. युद्ध पूर्णपणे थांबल्यास सोन्याचे दर पुन्हा 1 लाख 70 हजारांपर्यंत जाऊ शकतात.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment