Home Remedies for Acidity: सध्याची धावपळीची जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे आरोग्याच्या अनेक समस्या वाढीस आल्या आहे. यात अॅसिडिटीची समस्या अनेकांना उद्भवते. सामान्यतः गॅस्ट्रिक ग्रंथीद्वारे जास्त प्रमाणात अम्ल तयार झाल्याने अॅसिडिटी होते. अॅसिडिटीमुळे पोटात जळजळ होणे, छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे आणि अस्वस्थता जाणवते. अशात तुम्ही देखील अॅसिडिटीच्या समस्येने त्रास्त असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरु शकते. या लेखात आम्ही तुम्हला अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. चलातर मग जाणून घेऊया काय आहेत ते उपाय.
‘हे’ आहेत घरगुती उपाय
पुदिन्याची पाने
अॅसिडिटीच्या समस्येत पुदिन्याची पाने खूप लाभदायक ठरतात. पुदिना पोटाला नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यास मदत करतो. करण, पुदिन्याच्या पानांमध्ये पाचक गुणधर्म असतात. पुदिना हा अॅसिडिटीच्या समस्येवर प्रभावी घरगुती उपाय मनाला जातो. यामुळे अॅसिडिटी आणि छातीतील जळजळ होत असल्यास पुदिन्याची पाने खावीत.
ताकाचे सेवन
आयुर्वेदात ताक पिण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहे. अॅसिडिटी आणि त्यामुळे होणारी छातीतील जळजळ रोखण्यासाठी ताक पिणे फायदेशीर ठरते. अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळविण्यासाठी तुम्ही दररोज एका ग्लास ताक पिऊ शकतात. पोट थंड ठेवत अपचनाची समस्या दूर ठेवण्यासाठी ताक प्रभावी ठरते.
नारळपाणी
अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले नारळपाणी अॅसिडिटी आणि पोटाशी संबंधित इतर समस्यांमध्ये फायद्याचाही ठरते. नारळ पाण्यात भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे पचनसंस्था सुरळीत होते. यासह अॅसिडिटीमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या दुष्परिणामांपासून संरक्षण मिळते.
जिऱ्याचे पाणी
शरीरातील पचनक्रिया चांगल्या पद्धतीने सुरळीत ठेवण्यासाठी जिरे हे प्रभावी औषध ठरते. पाचकरस वाढविण्यासाठी, अॅसिडिटी आणि पोटाच्या इतर समस्या कमी करण्यासाठी जिरे उपयुक्त आहे. अॅसिडिटीच्या समस्येत जिऱ्याचे पाणी पिणे रामबाण उपाय ठरतो.
(डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)











