होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

भारताकडे ‘इतक्या’ महिन्यांचा इंधनसाठा शिल्लक, इंधन पुरवठ्याबाबतचे धोरण कसे आहे? जाणून घ्या!

On: March 27, 2026 2:41 PM
Follow Us:
---Advertisement---

 Stock Of Inidian Oil: इराणने होर्मूझ सामुद्रधुनी मधील वाहतुक बंद केल्याने दक्षिण आशिया आणि आजूबाजूच्या देशांना इंधनाचा पूरवठा करण्यात अडथळे निर्माण झाले आहे. तेल वाहतुकीचा मुख्य मार्गच इराणने बंद केल्याने सामन्यांना अडचणीचा सामना करावा लागत, आपातकालीन स्थितीत अनेक देशांनी इंधनाचा साठा केला आहे. काही देशांचा तो साठा कमी होत आहे. भारताने देखील आपला साठा धोरण निश्चित केले आहे. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी जवळपास दोन महिन्यांचा स्थिर इंधनसाठा उपलब्ध आहे. पुढील 2 महिन्यांची कच्च्या तेलाची खरेदी देखील सुरक्षित झाली आहे, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाला आता जवळपास आज २७ झाले आहे. मात्र होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती तणावपूर्ण असूनही भारताला आज जगभरातील 41 पेक्षा जास्त पुरवठादारांकडून पूर्वी या सामुद्रधुनीतून येणाऱ्या तेलापेक्षा अधिक कच्चे तेल मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये, विशेषतः पश्चिम गोलार्धातून उपलब्ध झालेल्या मोठ्या प्रमाणातील पुरवठ्याने कोणत्याही तूटीची भरपाई केली आहे. प्रत्येक भारतीय तेल शुद्धीकरण कारखाना 100% पेक्षा जास्त क्षमतेने कार्यरत आहे. भारतीय तेल कंपन्यांनी पुढील 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा पुरवठा आधीच निश्चित केला आहे. पुरवठ्यात कोणतीही तूट नाही.

देशात केवळ 6 दिवसांचा इंधनसाठा शिल्लक असल्याची चुकीची माहिती समाज माध्यमामध्ये पसरवली जात आहे,मात्र देशात मुबलक प्रमाणात इंधन आहे. मध्य पूर्वेतील संकटाचा 27 वा दिवस असतानाही, भारताकडे एकूण 74 दिवसांची राखीव क्षमता आहे,आणि सध्या प्रत्यक्षसाठा सुमारे 60 दिवसांचा आहे (यात कच्च्या तेलाचा साठा, उत्पादित मालाचा साठा आणि भुयारी विशेष धोरणात्मक साठवणुकीचा समावेश आहे. जागतिक स्तरावर काहीही परिस्थिती असली तरी, प्रत्येक भारतीय नागरिकासाठी जवळपास दोन महिन्यांचा स्थिर इंधन साठा उपलब्ध आहे. पुढील 2 महिन्यांची कच्च्या तेलाची खरेदी देखील सुरक्षित झाली आहे. भारत पुढील अनेक महिन्यांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. अशा परिस्थितीत धोरणात्मक भुयारी साठवणुकीचे प्रमाण दुय्यम ठरते. त्यामुळे, भारताचा साठा कमी झाला आहे, किंवा अपुरा आहे असा होत नसल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment