होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

International Forest Day: आंतरराष्ट्रीय वन दिन: वन संवर्धन ही लोकचळवळ व्हावी!

On: March 21, 2026 12:30 PM
Follow Us:
---Advertisement---

International Forest Day: आंतरराष्ट्रीय वन दिन हा २१ मार्च रोजी साजरा केला जातो, हा दिवस २८ नोव्हेंबर २०१२ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत एका ठरावाद्वारे सुरू झाला. वनाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा हा दिवस, भावी पिढ्यांना वनाबाबत जागृत केले जात आहे, त्यांना वन, जंगले, झाडे याचे मानवाला होणारे फायदे कोणते आहेत, ते पटवून देण्याचा उद्देशाने दरवर्षी पाळला जातो. आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त, वृक्षारोपण मोहिमा राबविल्या जातात. जंगलांचे संवर्धन आणि झाडांशी किंवा वनाशी संबंधित स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उपक्रमाद्वारे सर्व देशांना प्रोत्साहित केले जाते. संयुक्त राष्ट्र वन मंचाचे सचिवालय, अन्न आणि कृषी संघटना, विविध सरकारे, वन क्षेत्रात काम करणाऱ्या सहयोगी संस्था आणि आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक आणि उप-प्रादेशिक संस्थांच्या सहकार्याने अशा कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची व्यवस्था करण्यात आली.खरे तर २०१२ मध्ये युएनमध्ये ठराव झाल्यावर नियमित हा दिवस २१ मार्च २०१३ पासून साजरा केला गेला. वन आणि अर्थव्यवस्था याचा एकमेंकाशी परस्पर संबंध आहे.

जंगलांच महत्त्व आपण व्हिडिओद्वारे सांगू शकतो, जंगलाविषयी माहिती देणारे ॲनिमेशन, लोगो आणि बॅनर शेअर करून त्याबद्दल जागरूकता निर्माण करू शकतो. वन दिनाबाबत माहितीपट तयार करून तो सर्वत्र दाखवू शकतो. ‘आंतरराष्ट्रीय वन दिन हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहचवू शकतो, तसेच त्यावर चर्चा घडवून आणू शकतो. झाडे जगवा झाडे वाचवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, संतांनी आपल्या संदेशात झाडांचे महत्त्व सांगितले आहे. असे संदेश सर्वाना पाठवून लोकांमध्ये जागृती निर्माण करता येईल. जंगलांचे फोटो आणि व्हिडिओ काढून ते पाठवूच पण जंगलाविषयी चित्रकला स्पर्धा घेऊन उत्कृष्ट चित्राला पारितोषिक देऊन युवापिढीला प्रोत्साहन देता येईल.

जगभरात जंगले वाचवणारी मोहिम उघडून त्यात लोक सहभाग वाढवता येईल, जंगले आपल्यासाठी किती महत्त्वाची आहेत ते सांगणारा जंगलांचा महोत्सव सुरू करता येऊ शकतो. दरवर्षी वृक्षरोपण मोहिम राबवून जंगले वाढवता येतील. वने ही आपल्या अर्थव्यवस्थेला ही चालना देऊ शकता. प्रत्येक आंतरराष्ट्रीय वन दिनाची संकल्पना ‘कोलॅबोरेटिव्ह पार्टनरशिप ऑन फॉरेस्ट्स’ द्वारे निवडली जाते. जंगलामुळे आपल्या स्वच्छ पाणी उपलब्ध होते, कार्बनचे प्रमाण कमी करण्यास व तापमान नियंत्रित करण्यास मदत होते. पशूपक्षी यांना हक्काचा निवारा मिळतो. जंगलांमुळे निसर्गाचे संतुलन राखले जाते. सध्या जंगल तोड मोठया प्रमाणात होत असल्याने तेथील प्राण्यांचा अदिवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अब्जावधी डॉलर्सचा खर्च येऊ शकणाऱ्या हवामान-संबंधित आपत्तींपासून अर्थव्यवस्थांचे संरक्षण करण्यास मदत करतात.

वने आणि अर्थव्यवस्था एकमेकांना पूरक

२०२६ च्या आंतरराष्ट्रीय वन दिनाची संकल्पना ‘वने आणि अर्थव्यवस्था’ ही आहे, जी आर्थिक समृद्धीला चालना देण्यात वनांच्या महत्त्वपूर्ण भूमिका रेखांकित करते. वन उत्पादनातून मिळणारे उत्पन्न आणि रोजगार, तसेच नवीन कच्चा माल आणि अन्नपदार्थांच्या व्यापारापलीकडे जातात, वने कौटुंबिक आणि सामुदायिक शेतीलाही आधार देतात, कृषी उत्पादकता वाढवतात आणि निरोगी पाणलोट क्षेत्रांचे संरक्षण करतात.

अनेक देश शाश्वत जैव-अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करू पाहत असल्याने, वन उत्पादने कार्बन-केंद्रित सामग्रीला पर्याय म्हणून निसर्ग-आधारित उपाय मनाला जातो. त्याच वेळी नवीन आर्थिक संधी निर्माण करतात. सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी वने अपरिहार्य आहेत आजच्या आणि भावी पिढ्यांसाठीही त्याची गरज युएनने व्यक्त केली आहे. युनायटेड नेशनने दिलेल्या एका माहिती प्रमाणे अंदाजे ४४ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जगाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या निम्म्याहून अधिक अर्थकारण हे जंगल आणि निसर्गावर अवलंबून असल्याचे दिसते. उत्पादित केलेले लाकूड आणि बांबू यांचा वापर पोलाद, काँक्रीट आणि प्लॅस्टिक यांसारख्या कार्बन-केंद्रित सामग्रीसाठी नविन पर्याय होऊ शकतो.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment