होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल असल्याची तपासी अधिकाऱ्यांची माहिती; ‘एसआयटी’ने तपासाबाबत कोणते खुलासे केलेत.. ते जाणून घ्या!

On: April 7, 2026 7:07 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: अशोक खरात विरोधात आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यातील नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात 10 गुन्हे तर त् 8 गुन्हे लैगिक शोषणाचे तर 2 गुन्हे फसवणुकीचे आहेत. याव्यतिरिक्त शिर्डी आणि रहाता या दोन ठिकाणी प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला दोन्ही गुन्हे फसवणुकीचे आहेत, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी दिली. खरात प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीची पत्रकार परिषद आज पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी घेतली. याप्रकरणी खरातला 17 मार्च रोजी अटक करण्यात आली होती, 18 मार्चला न्यायालयात हजर करण्यात आले होते, त्यानंतर पहिल्या गुन्ह्यात 14 दिवसांची पोलिस कोठडी तर दुसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याआधीच तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेत आजपर्यंतच्या तपासाबाबत माहिती दिली. अशोक खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल करुन, महिला अत्याचाराचे 8 आणि आर्थिक फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्यभर असलेल्या अशोक खरात प्रकरणी 20 मार्चपासून एसआयटीने तपास सुरू केला आहे, सदर विशेष तपास पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून दोन पोलीस उपाधीक्षक आहेत. त्याच पद्धतीने सहाय्यक तपास अधिकारी म्हणून तीन पोलीस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार असे एकूण 24 जणांचे पथक तपासासाठी कार्यरत आहे. अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि नगर जिल्हा या दोन्हींमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत, अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसात अशोक खरातने राजेंद्र जासूद आणि दिनेश परब याच्या विरोधात 5 कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, तर शिर्डी पोलिसांत अशोक खरातचा ऑफिसबॉय नीरज जाधव याच्याविरोधात एका महिलेने बनावट व्हिडीओ व्हायरल करायची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, या दोन गुन्ह्यामुळे अशोक खरातचे कारनामे समोर आले. कारवाईची व्याप्ती वाढत गेली खरात वर फास आवळ्यावर याच दोन गुन्ह्यानंतर राज्य सरकारने एसआयटी पथकाची स्थापना केली, असे सातपुते यांनी सांगितले.

कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून लैंगिक शोषण करत असल्याचा खुलासा ही त्यांनी केला, त्यात आजपर्यंतच्या 30 पेक्षा अधिक साक्षीदारांकडं आपण विचारपूस केलेली आहे, साक्षीदारांकडे आणि पीडितांची चौकशी केली त्यातून आरोपी खरात हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना भीती दाखवत होता. व रुद्राक्ष, खडे,चिंचोके, पूजा आदी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून त्यांच्या कुटुंबीयांना मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देत असे, तसेच त्यांचे लैंगिक शोषण करत होता. त्याच पद्धतीने ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाकीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून समाजामध्ये सातत्याने अंधश्रद्धा पसरवण्याचं काम केल्याचे त्यांनी सांगितले.

पिढीतांचे सोशल मीडियावरती व्हिडिओज न पसरवणे आपल्या मोबाईल्समध्ये असे व्हिडिओ न बाळगणे हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य आहेत. पण याशिवाय, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे देखील तसे कठोर निर्देश आहेत. त्यांची ओळख गोपनीय राहणे आणि त्यांच्या खासगी बाबींची सार्वजनिक चर्चा न करणे, तसेच त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी काळजी घेत त्यांचे मनोधैर्य टिकून राहणे गरजेचे आहे. न्यायसंस्थेने वारंवार आयडेंटिटी डिस्लोजर अशी भूमिका ठेवलेली आहे, अशा केसेसमध्ये पोलिसांच्या पत्रकार परिषदेत बाबतीत देखील मर्यादा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. पीडितेच्या गोपनीयतेचा भंग ज्या समाज माध्यमातून झाला आहे, अशा प्लॅटफॉर्मवरून ती माहिती हटवण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत, त्यानुसार 4650 लिंक काढल्या असून त्यात दोन 2 गुन्हे दाखल करून 6 जणांना तब्यत घेण्यात आले तसेच पिडीतांचे सर्व व्हिडिओ हटविण्यात आल्याचे सातपुते यांनी सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment