America-Israel-Iran War: इस्रायलवर क्लस्टर बॉबने हल्ला करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला. त्यामुळे इराण सर्रासपणे इस्रायलच्या तेल अवीव शहरात नुकसान पोहचविण्याचे काम करत आहे. त्यामुळे इस्रायलयला मोठे जमीवर मोठे नुकसान सहन करावे लागत, इस्रायल देखील तेहरानवर हल्ले करत आहे. युद्धाने भीषण रूप धारणा केले आहे. इराण अनेक मिसाईल तेल अवीववर डागत असून त्यापैकी एक तरी मिसाईल क्लस्टर वॉरहेड असलेली असल्याने इस्रायलचे नुकसान होताना दिसून येत आहे. रॉयटर वृत्तसंस्थने ही हे बातमी दिली असून एका व्हिडीओ सोशल मीडियात मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात अनेक मिसाईल डागल्यानंतर त्यातील एका मिसाईल हवेतच वॉरहेड पसरवत खाली येत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आगीचे गोळे जमिनीवर पडल्यावर मोठे नुकसान होत असलयाचे दिसत आहे.
सोमवारी मध्यरात्री हे दृश्य पहायला मिळाले, दरम्यान इस्रायलला हे बॉम्ब इंटरसेफ्ट करण्यात अपयश येत आहे. अनेक मिसाईलमधून क्लस्टर बॉम्ब जमिनीवर आदळत आहे. जगभरात असे वापरण्यास आधीच बंदी आहे, मात्र या युद्धात दोन्ही बाजूनी क्लस्टर बॉम्ब वापरले जात असल्याचा आरोप-प्रत्यारोप सुरू आहे, अत्यंत घातक समाजाला जाणारा बॉम्ब जमिनीवर मोठी नासधूस करतो, त्याचे मनुष्याला ही गंभीर परिणाम भोगावे लागत आहे. त्यामुळे अशा बॉम्बवर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना मोठा दावा केला आहे. अमेरीकेचा इराणच्या विद्युत प्रकल्पावर मोठा हल्ला करण्याच्या तयारी होती, मात्र या हल्ल्या आधीच इराणने चर्चेची मागणे पुढे केल्याने हा हल्ला थांबविण्यात वाक्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे, यासाठी मोठी तयारी अमेरिकेने केली होती असेही त्यांनी सांगितले. सध्या चर्चेला इराण तयार झाल्याने अमेरिका -इस्राईल आणि इराण यांनी तात्पुरता ५ दिवसांचा युद्धबंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तेल आणि गॅस ची वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा व्यक्त होता आहे. तसेच एका कार्यकमात राष्ट्रपती तृणप यांनी इराण युद्धाचे खापर अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेट यांच्यावर फोडले आहे. त्यांनीच हल्ल्याचा पहिला सल्ला दिल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. दरम्यान भारताचा मित्र रशिया पुन्हा भारताच्या मदतीला धावून आला असून त्यांनी चीनला जाणारे ६ तेल टँकर भारताच्या दिशेने वळविले आहे. त्यामुळे भारताची तेलाची गरज पूर्ण होणार आहे.





