होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

On: April 4, 2026 3:22 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी देश- विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतील. या भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा निर्मिती शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कुंभमेळ्यानिमित्त सुरू झालेली कामे वेळेत पूर्ण होतील याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावयाची आहे. याबरोबरच ही सर्व कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होतील याचीही दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.अग्रवाल हे सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करण्यासाठी व कामांचा आढावा घेण्यासाठी आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत.

मुख्य सचिव अग्रवाल यांनी द्वारका सर्कल येथील भुयारी मार्ग, तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ बांधण्यात येणारा समांतर पूल, कपिला संगम, साधुग्राम, गोदावरी नदी काठावर जलसंपदा विभागातर्फे सुरू असलेल्या नवीन घाटांच्या कामांची तसेच नाशिक महानगरपालिकेतर्फे तपोवन, आगरटाकळी, दसक-पंचक येथे सुरू असलेल्या मल जल शुद्धीकरण प्रकल्पांची पाहणी केली. त्यानंतर अग्रवाल यांनी पांडव लेणीजवळील महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन, खत निर्मिती प्रकल्पांची पाहणी केली. तसेच त्यांनी महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली, यावेळी राजुर बहुला येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीतर्फे उभारण्यात येणाऱ्‍या वीज उपकेंद्राचीही मुख्य सचिव अग्रवाल यांनी पाहणी केली.

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सांगितले की, पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे सर्वतोपरी नियोजन करण्यात आले आहे. विविध विकास कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान करून विकास कामे सुरू झाली आहेत. ही विकास कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सनियंत्रण करण्यात येत असल्याचे सांगितले. कुंभमेळा आयुक्त सिंह यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती मुख्य सचिव अग्रवाल यांना दिली

यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, महानगरपालिकेचे उपायुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल आदी उपस्थित होते.

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment