होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

On: March 25, 2026 2:32 PM
Follow Us:
---Advertisement---

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतांना दिलासादायक माहिती समोर आली आहे. सामाजिक न्याय विभागानं फेब्रुवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी 277 कोटी रुपये महिला व बालविकास खात्याच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना लवकरच 1500 रुपये मिळण्याची शक्यता आहे.

 

महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेतून दरमहा महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जातात. जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील महिलांचं लक्ष लागलं आहे. अशात दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 277 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहि‍णींना दिला जाऊ शकते.

 

ई-केवायसी दुरुस्तीची 31 मार्च पर्यंत संधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरु करण्यात आल्यानंतर त्या योजनेचे काही निकष तयार करण्यात आले होते. त्या निकषानुसार ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्याच लाडक्या बहि‍णींना या योजनेचा लाभ घेता येणार होता. या योजनेचा लाभ पात्र लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारच्यावतीनं लाभार्थींसंदर्भात विविध विभागांकडून प्रथम माहिती मागवली. त्यानंतर राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी करण्यास सांगण्यात आलं होतं.

 

ई केवायसी प्रक्रिया मोबाईलवरुन किंवा संगणकावरुन पूर्ण करायची होती. ती पूर्ण करताना काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्याचं समोर आलं होतं. यामुळं ज्या महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेले होते, त्यांना दुरुस्तीची संधी 31 मार्च पर्यंत देण्यात आली होती. आता लाडकी बहीण योजनेची ई केवायसी दुरुस्त करण्यास महिलांकडे 6 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment