होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या? कुठल्याही पक्षाचा नेता असो, त्याच्यावर कारवाई करा : उद्धव ठाकरे

On: March 22, 2026 5:17 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: राज्यभर नाशिकचे अशोक खरात प्रकरण गाजत असून विरोधांनी हे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला ठाकरे यांनी या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. ते म्हणाले, नेमके पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या. कुठल्याही पक्षाचा नेता असो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे सांगून उद्धव ठाकरे याणी मागणी केली. तसेच गावोगावी असलेल्या भोंदूबाबांवर त्यांच्याकडे जाणारा कोणत्याही पक्षाचा नेता असो, त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे, असे आवाहन केले.

खरातच्या भोंदू भक्तांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. कर्तुत्वशून्य आणि भाकड नेत्यांनाच भोंदूगिरीचा आश्रय घ्यावा लागतो अशी टीका त्यांनी यावेळी केली. त्यामुळे महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायद्याचे पालन करणारेच भोंदू बाबाच्या नादी लागणार तर भोंद भक्तांवरही कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली. स्वकर्तुत्वाने काही करू शकत नाही तेच लोक अशा भोंदूगिरीचा सहारा घेतात, असे भाकड नेते वेळेत लॉजिस्टीकच्या कोर्समध्ये आले तर आम्ही त्यांच्या आयुष्याचे भले करू शकतो, असा टोमणा ही त्यांनी मारला.

महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात अशोक खरातच्या निवासस्थानाला नाशिक जिल्ह्यातील कालव्यातून पाणी सोडल्याचा आरोप होत आहे. त्याबाबत प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही सगळ्यांची चौकशी करा पण पाणी वळविले असेल तर नेमके पाणी कुठपर्यंत मुरलंय ते ही कळू द्या. पण ते कळल्यावर त्याच्यावर कारवाई करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच यानिमित्ताने गावोगावी असलेल्या भोंदूबाबांवर आणि त्यांच्याकडे कुठल्याही पक्षाचा नेता जात असेल तर त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे, ओम फट स्वाहा.. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आवाहन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment