LPG cylinder shortage: अमेरिका- इस्रायल-इराण युद्धामुळे एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडर २१ दिवसांनतर मिळतो, मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पूरवठा कमी करण्यात आला होता, त्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आल्याने हॉटेल चालकांना आपला व्यवसाय बंद ठेवण्याची वेळा आली होती. आता तो पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न केंद्र शासनाने सुरू केले असून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे हॉटेल चालकांसमोरची अडचण दूर होऊन हॉटेल पूर्वरत सुरू करण्यास मदत होणार आहे. गॅस सिलेंडर तुटवड्याने व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसल्याचे हॉटेल चालकांनी सांगितले.
गॅस सिलेंडरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे पहिल्यांदा घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यावर शासनाचे लक्ष होते, आता तो पुरवठा हळूहळू पूर्वरत होत आहे, मात्र व्यावसायिक गॅसचा पूरवठा अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेला नाही. हा पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणखी २० टक्के वाढीव गॅसला मंजूरी मिळाली आहे. आता हा पुरवठा ५०टक्क्यावर गेला आहे, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे, अपुऱ्या पुरवठ्यामुळे हॉटेल चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला. १० ते १५ टक्के हॉटेल चालकांनी आपली हॉटेल्स बंद ठेवली होती. आता या निर्णयामुळे त्यांना आपले व्यवसाय पूर्वरत करता येईल. त्यामुळे हॉटेल चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
त्यातच अमेरिका इस्रायल इराण यांच्यातील युद्ध अद्याप संपलेले नाही, इराणने होर्मुजची खाडीतील टँकरची वाहतूक रोखल्याने तेल आणि गॅसचा पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता,त्याची झळ जगाला बसल्याने अमेरिकेची ही चिंता वाढली आहे. त्यात अमेरिकेसह ब्रिटन, फ्रांस, इटली, जपान आदीनी पुढाकार घेत होर्मुज खाडी मुक्त करण्यासाठी आपले नौदल पाठविण्याचा निर्णय घेतल्याने आता युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. मात्र गॅस आणि इंधन पूरवठा सुरळीत करण्याचा अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचा इरादा आहे.










