Mahavir Jayanti 2026: अहिंसा, त्याग, प्राणीमात्रांचे संरक्षण आणि ध्यान याचे महत्त्व संपूर्ण जगाला भगवान महावीर यांनी पटवून दिले. त्यांची जयंती दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते. यावर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी तिथी ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ७. ०९ वाजता सुरू होईल आणि ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संपेल. तिथीनुसार, महावीर जयंती ३१ मार्च रोजी साजरी केली जाईल. तथापि, ज्यांना त्रयोदशीला हा सण साजरा करायचा आहे, ते ३० मार्च रोजी देखील साजरा करतात. परंतु जैन परंपरा आणि पंचांगानुसार, बहुतेक ठिकाणी महावीर जयंती ३१ मार्च रोजी साजरी केली जाते. भगवान महावीर जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर आहेत.
भगवान महावीरांचे जीवनचरित्र
महावीरांचा जन्म इ. स. पूर्व ५९९ मध्ये वैशाली (बिहार) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव राजा सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते. भगवान महावीरांचे मूळ नाव वर्धमान होते. त्यांनी वयाच्या ३० व्या वर्षी आपल्या राज्याचा त्याग केला आणि १२ वर्ष कठोर तपचर्या केल्यावर त्यांना ज्ञानप्राप्ती झाला. भगवान महावीरांच्या जन्माच्या स्मरणार्थ महावीर जयंती साजरी केली जाते. त्यांनी मानवतेला अहिंसा, सत्य, अनासक्ती आणि वैराग्याचा मार्ग दाखवला. त्यांची शिकवण आजही समाजाला शांती आणि सलोख्याचा संदेश देत आहे. या दिवशी जैन समुदाय पूजा, रथयात्रा आणि दानधर्म करतो.
या दिवशी त्याग आणि लोकसेवेला विशेष महत्त्व आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजीत केले जातात, जैन समाजातील बांधव विविध प्रकारे या दिवशी सेवाभाव जोपासतात. देणग्या, प्रार्थना, उपासना आणि कुशलकर्म करण्यासाठी प्रयत्नशील असतात. आज अनेक बांधव महावीर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आहे, ध्यानासाठी प्रार्थना मंदिरे उभारून त्यांच्या कार्याला समाजापर्यंत पोहचवत आहे. जैन मंदिरांच्या माध्यमांतून भगवान महावीर यांच्या ध्यान, त्याग आणि शांतीचा मार्ग अवलंबून आपले कल्याण साधत आहे. गायीचे आणि प्राण्याचे संरक्षण करणे, किंवा प्राणी हत्येपासून परावृत्त करणे अशा प्रकारे अहिंसेच महत्त्व पेटवून देत आहे.
प्राण्याचे संरक्षण करण्यासोबतच अन्नदान करणे, गोरगरिबांना मदत करणे, धर्मादाय कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी देणगी गोळा केली जाते. भारतातील प्राचीन जैन मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भक्त उत्सवांमध्ये सहभागी होतात. महावीरांच्या अहिंसा संदेशाचे प्रचार करताना आज अहिंसा दिवस आणि रॅली काढून महावीर यांचे संदेश समाजापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला जातो. भगवान महावीर यांची जयंती म्हणून हा दिवस देशभरात आदर आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. हा सण आपल्याला शांती, संयम आणि आत्मशुद्धी आणि अंतर्मुख होण्याचा संदेश देतो. आजच्या काळात तणाव आणि हिंसाचार वाढत आहे, तेव्हा भगवान महावीरांची शिकवण अधिकच समाजाला आणि मानवतेला प्रेरणा देणारी आहे. मानवतेला अहिंसा, सत्य, अनासक्ती आणि वैराग्याचा मार्ग दाखवणारी आहे. त्यांची शिकवण आजही समाजाला शांती आणि सलोख्याचा संदेश देत आहे.
*अहिंसा ही परमो धर्म
*प्राणी मात्रांवर द्या करा
*सत्यचा मार्ग अवलंब करा
*दान पुण्यकर्म करा.
*दुसऱ्यांच्या जीवनाचा आणि विचारांचा सन्मान करणे
*शांती आणि सहिष्णूता
*त्यांनी मानवाला जीवन जगण्याचा अनमोल मार्ग दाखविला.










