होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मोठी बातमी: चोपडा शहरातील नागरिकांना मोठा दिलासा; बांधकामासाठी ‘ही’ अट झाली शिथील…

On: March 24, 2026 4:37 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: चोपडा शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बांधकामासाठी जी जुनी तरतूद होती आता ती शिथिल करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून शहरातील बांधकामाला जुन्या अटीमुळे अडचण येत होती, आता नव्या निर्णयाने दिलासा मिळाणार आहे, याबाबत विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाला, दरम्यान चोपडा शहरातील रत्नावती नदीलगतच्या पूररेषा क्षेत्रात बांधकामासाठी ०.४५ मीटर उंचीची तरतूद लागू करण्यात येणार असून त्याबाबतचे निर्देश लवकरच जारी केले जातील, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

चोपडा शहराची विकास योजना २० मे २०१६ पासून लागू असून रत्नावती नदीलगत पूररेषा निश्चित करण्यात आली आहे. या अंतर्गत उच्चतम पूररेषेत किमान २.५ मीटर उंचीचे (स्टील्ट) बांधकाम बंधनकारक आहे. मात्र २००६ नंतर मोठा पूर आलेला नसल्याने ही अट शिथील करून ०.४५ मीटर उंचीची तरतूद लागू करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत शासनाने निर्णय घ्यावा, अशी लक्षवेधी सूचना सदस्य चंद्रकांत सोनवणे यांनी मांडली.

चोपडा शहर विकास योजनेनुसार उच्चतम पूररेषेत २.५ मीटर उंचीचे (स्टील्ट) बांधकाम बंधनकारक होते. मात्र, एकसंध विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (यूडीसीपीआर) लागू झाल्यानंतर या संदर्भातील पूर्वीच्या तरतुदी रद्द ठरतात. युडीसीपीआरमध्ये स्पष्टपणे ०.४५ मीटर उंचीची तरतूद नमूद असल्याने, सदस्यांच्या मागणीनुसार तीच तरतूद चोपडा शहरासाठी लागू करण्यात येणार आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले. त्यामुळे चोपडा शहरातील नागरिकांचा रत्नावती नदीलगत बांधकामाचा प्रश्न निकाली निघाला आहे. या निर्णयामुळे बांधकामातील अडथळे दूर होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

Railway To Run Special Trains: खान्देश वासियांनो लक्ष द्या! हटिया, संतरागाछीसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या..

Leave a Comment