होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

दहा हजारांची लाच घेणं भोवलं; धुळे जि.प.च्या प्रभारी अधीक्षकाला तीन वर्षे सक्तमजुरी

On: March 19, 2026 5:34 PM
Follow Us:
---Advertisement---

Dhule News: दहा हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील तत्कालीन प्रभारी कार्यालयीन अधीक्षक पंकज विक्रम पाटील याच्याविरुद्ध न्यायालयाने हा निकाल दिला आहे. लाचखोर पंकज पाटील याने लाच स्विकारली होती. या दोषी अढळल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने पंकज पाटील याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे लाचखोर भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

प्रकरणानुसार, तक्रारदाराने शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथे अंगणवाडी इमारतीचे बांधकाम घेतले होते. हे काम निर्धारित वेळेत पूर्ण न झाल्याने संबंधित उपअभियंत्यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. ही कारवाई मागे घेण्यासाठी आणि प्रकरण मिटवण्यासाठी प्रभारी कार्यालयीन अधीक्षक पाटील यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर 16 सप्टेंबर 2016 रोजी सापळा रचण्यात आला आणि पाटील याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.

याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक यांनी सखोल चौकशी केली. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. तापकीर यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सादर करण्यात आलेल्या साक्षी व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी पाटील याला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवले.

 

या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस उपअधीक्षक सचिन साळ्खे यांनी तपास प्रक्रियेवर देखरेख ठेवली. पैरवी अंमलदार प्रविण पाटील सागर शिर्के यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय्य केले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. देवेंद्रसिंह तवंर आणि अजय सानप यांनी युक्तिवाद केला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

Railway To Run Special Trains: खान्देश वासियांनो लक्ष द्या! हटिया, संतरागाछीसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या..

Leave a Comment