होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

भोंदूबाबा खरात प्रकरणी चाकणकर यांना सहआरोपी करा, पोलीस आयुक्तांची भेट घेत रुपाली ठोंबरे यांची मागणी

On: March 27, 2026 5:46 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात जे जे सहभागी अशा सर्वांवर कारवाई केली जाईल अशी माहिती नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. आता पर्यंत तरी खरात यांच्या संपर्कांतील एका ही राजकारण्यांना अटक अद्याप चौकशीसाठी ही बोलावलेले नाही. आता रुपाली ठोंबरे यांनी नाशिकला येऊन पोलीस आयुक्तांची यांची भेट घेऊन पीडित महिलांच्या अश्लील चित्रफिती समाज माध्यमात येत आहे, असे असतांना या प्रकरणात चाकणकर आणि त्यांच्या कुटूंबियांच्याही ही चित्रफिती समोर आणा, चाकणकर यांना सहआरोपी करा, अशी मागणी झाशीच्या राणी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली ठोंबरे यांनी केली. आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट झाल्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला

पत्रकारांशी बोलतांना रुपाली ठोंबरे म्हणाल्या, खरात प्रकरणात इतरांवर गुन्हा दाखल करण्याचा दबाव चाकणकरांनी आणला होता. या प्रकरणात राज्य महिला आयोगाकडे ज्या महिला आपल्या तक्रारी घेऊन जात होत्या. त्यांची भेट चाकणकर यांनी घेतली होती, त्यांच्या तक्रारी ऐकून घेत त्या महिलांना तुमचे ग्रह, तारे बघितले का, पत्रिका पाहिली का, अशी विचारणा त्यांना करून त्या महिलांना खरात याच्याकडे पाठवत होत्या असा आरोप ठोंबरे यांनी केला. खरात याला अटक झाल्यानंतर अनेक पीडितांनी प्रतिष्ठानशी संपर्क साधला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महिलांनी खरातच्या केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी दलाल म्हणून काम केले, प्राथमिक माहितीनुसार ही साखळी चाकणकर चालवत होत्या. या प्रकरणात चाकणकर यांना सहआरोपी करा, अशी मागणी ठोंबरे यांनी लावून धरली.

खरात प्रकरणात रोज नवी नवी माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणात महसूल विभागातील अनेक अधिकारी असू शकतात यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही रक उपजिल्हाधिकारी वाचवत असल्याचा आरोप केला होता.त्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही महसूल विभागातील काही अधिकारी खरातच्या संपर्कात असल्याचे मान्य केले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

Railway To Run Special Trains: खान्देश वासियांनो लक्ष द्या! हटिया, संतरागाछीसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या..

Leave a Comment