होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Cycling Rally In jalgaon: महापौर दीपमाला काळे यांचे ५० किमी सायकलिंग; जळगाव सायकलिंग ग्रुपतर्फे रॅली

On: March 27, 2026 6:39 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: श्री रामनवमीचे औचित्य साधून जळगाव सायकलिंग ग्रुप’तर्फे शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील चिमुकले राम मंदिर ते खेडी आव्हाणे गाव अशा या रॅलीमध्ये जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः ५० किलोमीटर सायकल चालवून रॅली पूर्ण केली आणि सायकलिस्टचा उत्साह द्विगुणित केला. या रॅलीत जळगाव सायकलिंग ग्रुपचे सुमारे ३० सभासद सहभागी झाले होते. यामध्ये धर्मादाय आयुक्त मोहन गाढे यांच्यासह अनेक मान्यवर सायकलिस्टनी सहभाग नोंदवला. रामनवमीच्या पवित्र मुहूर्तावर निरामय आरोग्याचा संदेश देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.

सायकल रॅली खेडी आव्हाणे गावात पोहोचल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी महापौरांचे आणि सायकलिस्टचे जोरदार स्वागत केले. यावेळी खेडी आव्हाणे गावाचे सरपंच कैलास चौधरी, आदर्श शेतकरी बाळू चौधरी, पोलीस पाटील, शरद सपकाळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि राम मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. महापौर दीपमाला काळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

भक्ती आणि व्यायामाचा संगम- एकीकडे रामजन्मोत्सवाचा उत्साह आणि दुसरीकडे सायकलिंगच्या माध्यमातून तंदुरुस्तीचा संदेश, अशा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ५० किलोमीटरचा टप्पा यशस्वीपणे पार केल्याबद्दल महापौरांचे आणि सर्व सदस्यांचे जळगावकरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

Railway To Run Special Trains: खान्देश वासियांनो लक्ष द्या! हटिया, संतरागाछीसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या..

Leave a Comment