होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

On: April 4, 2026 4:11 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे आयोजित ‘मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६’ चा थरार उद्या, रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी मखमालाबाद येथील क्रेड्यांक मैदानावर रंगणार आहे. सकाळी ७.३० वाजता या स्पर्धेला दिमाखात सुरुवात होणार असून, व्यापारी आणि उद्योजकांच्या ९ प्रमुख संघटनांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. स्पर्धेचे उदघाटन स्थायी समितीचे चेअरमन मछिंद्र सानप यांच्या हस्ते होणार आहे.

व्यापार आणि उद्योगाच्या धावपळीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळावा आणि सर्वांनी कुटुंबासह एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवावेत, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला नाशिकमधील व्यापारी वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ९ संघटना : १. नाशिक हार्डवेअर अँड पेन्ट्स मर्चंट असोसिएशन, २. नाशिक प्लायवुड मर्चंट्स अँड वेल्फेअर असोसिएशन, ३. नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन, ४. नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटना, ५. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, ६. नाशिक कम्प्युटर असोसिएशन, ७. महाराष्ट्र मालक-कामगार संघटना, ८. निमा (NIMA), ९. आयमा (AIMA). या स्पर्धेसाठी ‘संकल्प लॅण्डमार्क’चे प्रायोजकत्व लाभले असून, खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी ‘सहयाद्री हॉस्पिटल’तर्फे मैदानावर तातडीची आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रीन वूड कॅफे श्रध्दा बोरा-जैन यांचे अल्पोपहारासाठी सहकार्य लाभले आहे.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे, पूर्वाध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष संजय सोनवणे, क्रिकेट स्पर्धा समितीचे चेअरमन सलीम बटाडा, राज्य मुख्य समन्वयक वेदांशू पाटील, शाखा चेअरमन अंजू सिंघल, को-चेअरमन भावेश मानेक आणि कार्यकारिणी सदस्य सचिन शहा यांनी सर्व व्यापारी व उद्योजकांना या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी सचिन पाटील, रिझवान शेख, प्रल्हाद सुर्यवंशी, अविनाश पाठक प्रयत्नशील आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment