होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मनपाने गोलाणी मार्केटमध्ये राबविले स्वच्छता अभियान, २२ टन कचरा संकलित; महापौर दीपमाला काळे ॲक्शन मोडमध्ये

On: March 30, 2026 12:43 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मार्केट साफसफाई अभियानामध्ये रविवारी, २९ मार्च रोजी जळगाव शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केट परिसरात महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महापौरांनी स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी केली. या मोहिमेने मोठ्या प्रमाणावर जनजागृती निर्माण झाली.

प्रलंबित स्वच्छतेचा प्रश्न मार्गी

गोलाणी मार्केटमधील गाळेधारक कोर्टात गेल्यामुळे या परिसरातील स्वच्छतेचा मुद्दा दीर्घकाळापासून प्रलंबित होता. मात्र, स्थानिक नागरिकांनी महापौरांकडे सातत्याने केलेल्या तक्रारींची दखल घेत, महापौरांनी विशेष मोहिमेचे आयोजन केले. “व्यापाऱ्यांनी यापुढे स्वतःच्या दुकानांची स्वच्छतेबाबत जबाबदारी घ्यावी, दरवेळेला स्वच्छतेसाठी महापालिकेवर अवलंबून राहणे योग्य नाही,” अशा स्पष्ट शब्दांत महापौरांनी यावेळी दुकानदारांना सुनावले.

धडक कामगिरी: २२ टन कचरा उचलला

सहायक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ४५३ बीव्हीजी कामगारांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये यंत्रणा: ५ ट्रॅक्टर, ३ पिकअप आणि १ डंपरचा वापर, संकलन: तब्बल २२ टन कचरा मार्केट परिसरातून हटवण्यात आला.

विक्रेत्यांवर थेट कारवाई आणि इशारा

अभियानादरम्यान महापौरांनी फळ विक्रेत्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. खराब फळे, गवत आणि कागदी कचरा रस्त्यावर फेकणाऱ्या विक्रेत्यांना तो कचरा स्वतः उचलायला लावून कचराकुंडीत टाकण्यास भाग पाडले. तसेच, प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर थेट कारवाई करत पिशव्या जप्त करण्यात आल्या. येत्या दोन दिवसांत प्लास्टिकचा वापर सुरू ठेवल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या मोहिमेत स्थानिक नगरसेवक तथा माजी महापौर व शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, स्वच्छता अधिकारी अनिल कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, रुपेश भालेराव, मुकेश पाटील, समाधान निकम, मयूर सपकाळे, प्रदीप धापसे यांच्यासह विविध युनिटचे प्रमुख, स्वच्छता कर्मचारी आणि स्थानिक व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

“स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. दुकानदारांनी आपल्या दुकानाबाहेर कचराकुंडी ठेवावी, ग्राहकांना कचरा न टाकण्याचे आवाहन करावे आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवून बायोग्रेडेबल थैली किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा.”

— दीपमाला काळे, महापौर (जळगाव)

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

Railway To Run Special Trains: खान्देश वासियांनो लक्ष द्या! हटिया, संतरागाछीसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या..

Leave a Comment