होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेने पटकावला चषक! ‘मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६’

On: April 6, 2026 4:22 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे आयोजित ‘मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६’ चा थरार रविवार दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी मखमालाबाद येथील क्रेड्यांक मैदानावर उत्साहात झाला. नाशिक धान्य किरकोळ किराणा व्यापारी संघटना आणि कॉम्पुटर असोसिएशन, मोटर मालक कामगार वाहक संघटना आणि नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन या चार संघामध्ये उपांत्य सामने होऊन अंतिम सामन्यामध्ये नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेने मोटर मालक कामगार वाहक संघटनेवर मात करत ‘मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६’ आपले नाव कोरले. महाराष्ट्र चेंबरचे पूर्वाध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या हस्ते विजेत्या नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेला (किराणा किंग) ‘मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६’ देण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबरचे पूर्वाध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष संजय सोनवणे, क्रिकेट स्पर्धा समितीचे चेअरमन सलीम बटाडा, भाजपा आरोग्य आघाडीचे पप्पू शेख, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी हेतल पटेल, को-चेअरमन भावेश मानेक, संजय राठी आणि कार्यकारिणी सदस्य सचिन शहा, सुनिता फाल्गुने,मिथिला कापडणीस, दिपाली चांडक, रतन पडवळ उपस्थित होते. महाराष्ट्र चेंबरचे पूर्वाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी स्पर्धेचा उद्देश सांगून सहभागी संघटनांचे, खेळाडूंचे, विजेत्या संघाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. उपाध्यक्ष संजय सोनवणे, क्रिकेट स्पर्धा समितीचे चेअरमन सलीम बटाडा, भाजपा आरोग्य आघाडीचे पप्पू शेख, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी हेतल पटेल, यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.

मोटर मालक कर्मचारी वाहक संघटना आणि हार्डवेअर अँड पेंट्स मर्चंट वेल्फेअर असोसिएशन, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन, कॉम्प्युटर असोसिएशन आणि किराणा किंग, नासिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि निमा, कॉम्प्युटर असोसिएशन आणि प्लायवूड मर्चंट असोसिएशन, नाशिक डिस्टिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि निमा तसेच नाशिक धान्य किरकोळ किराणा व्यापारी संघटना आणि प्लायवूड मर्चंट असोसिएशन या संघांमध्ये दिवसभर झालेल्या विविध सामन्यात अतिशय चुरशीच्या लढती झाल्या. अनेकदा मैदानाच्या बाहेर चेंडू गेला. मीस फिल्डिंग, कॅच सुटणे, यासह उत्कृष्ट फील्डिंग व बॉलिंगही झाले, चित्त थरारक झालेल्या सामने झाले. व्यापार आणि उद्योगाच्या धावपळीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळावा आणि सर्वांनी कुटुंबासह एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवावेत, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नाशिकमधील व्यापारी वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

सद्या जळगावकरांना गारव्याचा दिलासा मात्र पुढील काळात उन्हाळा परीक्षा पाहणारा?

Railway Division Of Bhusaval: भुसावळ विभागाने या सेक्शनवरील वेगमर्यादा हटविली; वेगवान रेल्वे वाहतुकीला चालना!

जेष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप अवलस्थानी- आ. सुरेश भोळे; भाजपचा 46 वा स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

लोकसेवेतून जिवंत ठेवली मानवतेची ज्योत! कै. ॲड उज्वला गायकवाड यांना अनोखी श्रद्धांजली!

LPG Shortage: एलपीजी वितरण ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ प्रमाणेच होणार! या प्रणालीचा वापर 90% पर्यंत वाढला..

घरपट्टी- पाणीपट्टी इंडेक्स क्रमांक बंदची अफवा! मनपाने केला सायबर पोलिसात गुन्हा दाखल..

Leave a Comment