होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

राष्ट्रीय पालक दिन: पालक भाजीचे महत्त्व आणि इतिहास जाणून घ्या!

On: March 26, 2026 12:22 PM
Follow Us:
---Advertisement---

National Spinach Day: पालक पालेभाज्यामध्ये सर्वात आरोग्यदायी आहे, पालकाचे गुणधर्म हे आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करतात, पालक रोजच्या आहारात गरजेची आहे. या दिनाचे महत्व आणि तो कधी सुरू झाला, हे जाणून घेणे गरजेचे आहे. दरवर्षी २६ मार्च रोजी हा दिवस साजरा होतो. राष्ट्रीय पालक दिन, या पालेभाजीमध्ये असलेल्या आरोग्यदायी फायद्यांची आपल्याला आठवण करून देतो. पालक खाण्याचे अनेक पद्धती आहे. पण तो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर देखील आहे. खरे तर पालक मूळ भारतीय पीक नाही, ते मध्य आणि नैऋत्य आशियामध्ये घेतले जाते. याचा उगम प्राचीन पर्शियामध्ये झाला असावा असे मानले जाते. मात्र पालक अरब व्यापाऱ्यांनी भारतात आणल्याचे सांगितले जाते. त्यानंतर तो प्राचीन चीनमध्ये आणला असल्याचे सांगण्यात येते. भारतामध्ये ही आपली जुनी जाणती मंडळी पालकाचे महत्त्व नव्या पिढीला पटवून देत असते.

पालक जो आहे, तो ‘पर्शियन भाजी’ म्हणून ओळखला जात होता. पालक वनस्पतीची सर्वात जुनी नोंद एका चिनी दस्तऐवजात आढळली. त्यात नमूद केले आहे की पालक वनस्पती नेपाळमार्गे चीनमध्ये आणली गेली. फ्रान्सची राणी कॅथरीन डी मेडिसीला पालक आवडत होती. म्हणून तिच्या कार्यकाळात, कॅथरीन डी मेडिसीला पालक आवडत होती तिच्या कार्यकाळात तिने प्रत्येक जेवणात पालकाचा वापर केला असल्याचे सांगण्यात येते. पालकापासून बनवलेल्या पदार्थांना ‘फ्लोरेन्टाईन’ म्हणून ओळखले जाते, जे कॅथरीनच्या फ्लॉरेन्समध्ये झालेल्या जन्माचे प्रतीक आहे, असे मानले जाते.

पालकाचे प्रकार आणि फायदे

पालक खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यांची साधी भाजी केली जाते, कोणी पालक पनीर, शेपू पालक, पालक भजी आदी, रोजच्या आहारात पालकाचे विविध प्रकारचे व्यंजन बनवले जातात.पालक कच्चा किंवा शिजवून खाल्ला जातो आणि तो ताजा असतो, पालक हा लोहाच्या सर्वोत्तम स्रोतांपैकी एक मानला जातो. त्यात कॅल्शियम, फॉलिक ॲसिड, फायबर, प्रथिने, आणि जीवनसत्त्वे ए, सी, आणि के यांचा उत्कृष्ट स्रोत आहे, पालक खाण्याचे खूप सारे गुणधर्म असल्याने कर्करोगाशी लढणाऱ्या अँटीऑक्सिडंट्सने तो परिपूर्ण असतो, तसेच हृदय व रक्तवाहिन्या आणि पचनसंस्थेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. चीननंतर, अमेरिका जगात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक पालकाचे पीक घेते. कॅलिफोर्निया, ॲरिझोना आणि न्यू जर्सी ही अमेरिकेतील पालकाचे सर्वाधिक उत्पादन करणारी राज्ये आहेत. भारतात ही त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. पालक खाण्याचे अनेक फायदे असल्याचे आरोग्य विषयक तज्ज्ञ सांगतात.

त्यामुळे सामान्य लोकांमध्ये ही पालकाचे महत्त्व रुजले असून रोजच्या आहारात त्याचा वापर होतांना दिसून येतो. साधारण दोन कप ताज्या पालकामध्ये अंदाजे १४ कॅलरीज असतात गडद हिरवा पालक- गडद हिरव्या पालकाची पाने कुरळी असतात आणि उत्पादक सहसा ती ताज्या जुड्यांमध्ये विकतात. चपटे किंवा गुळगुळीत पाने असलेला हा पालक त्याच्या रुंद, गुळगुळीत पानांवरून ओळखला जातो. प्रामुख्याने डबाबंद आणि गोठवलेला पालक, सूप, बाळांचे अन्न आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांसाठी केला जाते. सुरकुतलेली पाने इतर पालकांपेक्षा अधिक खडबडीत असतात. पालक हा ताजी आणि प्रक्रिया करून विकला जातो, चीननंतर, अमेरिका जगात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक पालकाचे पीक घेते. कॅलिफोर्निया, ॲरिझोना आणि न्यू जर्सी ही अमेरिकेतील पालकाचे सर्वाधिक उत्पादन करणारी राज्ये आहेत.

पालकाचा रोजाच्या आहारातील वापर

तुमच्या नेहमीच्या भाज्यांच्या आहारात बदल करा आणि पालेभाज्यांमध्ये विविधता आणा. पालकासोबत काही प्रयोग करून पहा. ताज्या पालकाचे सॅलड, पालक पिझ्झा, पालक पनीर, आणखी बऱ्याच प्रकारे तुम्हाला पालकाची रेसिपी बनवता येऊ शकेल, पालक खाण्याचे फायदे तुम्ही इतरांना सांगू शकता, त्याचे गुणधर्म समजावू शकता, लहान मुलांमध्ये पालकाचे महत्त्व रुजवू शकता. लागवड देखील करू शकता, पालकाला जास्त जागेचीही गरज नसते. पालक सूर्यप्रकाश असलेल्या बाल्कनीमध्ये किंवा लहान बागेत कुंड्यांमध्ये वाढतो. सुपीक मातीचा वापर करा. थंड हवामानात लागवड करा. आर्द्रतेची पातळी सातत्यपूर्ण ठेवा. शरद ऋतूमध्ये पुन्हा लागवड करू शकता.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment