Parth Pawar Meet Shivtirtha: राज्यात एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. राजकारणाशी संबंधित या बातमीने राजकीय क्षेत्रातील अनेकांचे लक्ष वेधले आहे. अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते खा.पार्थ पवार यांनी (Parth Pawar) यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यात सुमारे एक ते दीड तास चर्चा झाली, या घटनेने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढविले जात आहे. नेमकी भेट कोणत्या कारणासाठी घेतली हे अधिकृत समजू शाळे नाही. मात्र वैयक्तिक भेट असल्याची ही चर्चा आहे.
राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार हे आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास अचानक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहचेले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन एक ते दिड तास चर्चा केली. भेटीनंतर पार्थ पवार यांनी प्रसारमाध्यमांशी ना बोलता निघून गेले, त्यामुळे या भेटीबाबत अधिक माहिती मिळाली नाही. सद्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि त्याभोवती असलेले संशयाचे धुके या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाचे मानली जात आहे. यापूवी रोहित पवार यांनी अजित पवार यांना न्याय मिळावा म्हणून देशातील आणि राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यातच काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन अजित पवार यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. राज ठाकरे यांनीही या प्रकरणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच प्रकरणासंदर्भात भेट झाल्याची चर्चा आहे.
भाजपच्या केद्रातील एका मंत्र्याने राष्टवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांचे नाव पुढे केले होते. मात्र यावेळी राज ठाकरे विरोध करून ‘मराठी पक्षाचा अध्यक्ष मराठीच असावा’ अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. याबाबत ही भेट असू शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.











