होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

राष्ट्रपती ट्रम्प याचा २४ तासांचा अल्टिमेटम; आणि इराणमध्ये हवाई हल्ल्यात १३ ठार

On: April 6, 2026 1:13 PM
Follow Us:
---Advertisement---

America Israel – Iran War : इराणला अमेरिकेने २४ तासात दुसऱ्यांदा अल्टिमेटम दिला आहे. पूल आणि ऊर्जा संस्थानांना लक्ष करण्याचा इशारा राष्ट्रपती ट्रम्प यांनी दिला. यापूर्वी बुशेहार अणुऊर्जा प्रकल्पावर अमेरिका- इस्रायलने हल्ला केला होता. या हल्ल्याबाबत आंतराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेने चिंता व्यक्त केली आहे, पुन्हा ट्रम्प यांनी होर्मूझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी २४ तासाचा इशारा दिला आहे. अन्यथा गंभीर परिणाम भोगायला तयार रहा असे स्पष्ट केले. त्यातच इराणची राजधानी तेहरानच्या एका शहरात निवासी इमारतीवर झालेल्या हवाई हल्ल्यात किमान १३ जण ठार झाले, असे वृत्त इराणी माध्यमांनी दिले आहे. फार्स वृत्तसंस्था आणि नूर न्यूजने इस्लामशायरजवळ हल्ल्याचे वृत्त दिले आहे. मात्र इस्रायल आणि अमेरिकेने हा हल्ला केला नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान इराणने अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे, तसेच इराणचा इस्रायलच्या तेल अवीव आणि इतर शहरांवर मिसाईलद्वारे हल्ले सुरू आहे. त्यामुळे हे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे.

तेहरानमध्ये हवाई हल्ला झाल्याने हा हल्ला नेमका कोणी केला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा थेट इशारा दिल्यानंतर हा हल्ला झाला आहे. परंतु सोमवारी अमेरिका किंवा इस्रायलने हवाई हल्ला केला नसल्याचे या दोन्ही देशांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे संभ्रम कायम आहे. पहाटे झालेल्या हवाई हल्ल्यांमध्ये तेहरानमधील शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीलाही लक्ष्य करण्यात आले आले आहे, विद्यापीठाच्या जवळ असणाऱ्या नॅचरल गॅस वितरण व्यवस्थेवरही हल्ला केल्याचे इराणी माध्यमांनी म्हटले आहे.

शरीफ विद्यापीठचे जे काही नुकसान झाले आहे, त्याची अधिकुत माहिती अजून समोर आली नसली तरी या हवाई हल्ल्यामुळे विद्यापीठाच्या काही भागाचे नुकसान झाल्याचे वृत्तात म्हटले आहे. विद्यापीठ इराणच्या लष्काराच्या सूचनेनुसार काम करते असा नेहमीच आरोप होत असतो, तसेच इराणच्या लष्करी सामर्थ्याला बळकटी देत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या संस्थेवर इस्रायलचे कायम नजर असते. दरम्यान इस्लामशायरजवळील निवासी इमारतीला देखील लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात १३ जण ठार झाल्याचे वृत्त आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment