होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon News: मोहफुलांपासून विविध पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणाला चालना; सतीश पाटील यांचे प्रतिपादन

On: March 28, 2026 2:53 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ बनविण्याच्या कार्यशाळेमुळे महिला सबलीकरणासोबतच उपजीविकेच्या अनेक संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आदिवासी विकास विभाग यावलचे सहायक प्रकल्पाधिकारी सतीश पाटील यांनी व्यक्त केली. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सरपंच दत्तर सिंग पावरा, वनरक्षक विजय शिरसाठ, प्रशिक्षक डॉ. सतिश गोगुलवार, अध्यक्ष गिरीश कुळकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर, संवाद सचिव पंकज व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस मान्यवराचे हस्ते सुती अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

प्रशांत सुर्यवंशी यांनी जीवन में कुछ करना है तो हिम्मत हारे मत बैठो… हे गीत सादर केले. सरपंच दत्तर सिंग पावरा म्हणाले की, मोहफुलांचा उपयोग केवळ दारु बनविण्यासाठी माहिती होता. मात्र रोटरी व गांधीतीर्थमुळे या नवीन पदार्थांची माहिती झाल्याचे त्यांनी सांगितले. वनरक्षक विजय शिरसाठ यांनी वनसंपदा आपल्यासाठी असून तिचा सुयोग्य कारणासाठी व्हावा. वनसंपदेच्या संवर्धन व मुल्यसंवर्धन याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता सांगितली.

डॉ. गोगुलवार यांनी आपण कार्यशाळेतून मिळालेले शिक्षण व्यवहारात उपयोगी आणावे, असे आवाहन त्यांनी केले. महिलांनी निर्माण केलेल्या पदार्थांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे असेही आवाहन आयोजकांनी केले. आज कार्यशाळेत मोहफुलांचा चिवडा, मोहफुलांचे लाडू व केक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेस ३८ आदिवासी भगिनींनी सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सुर्यवंशी यांनी केले. तर आभार सचिव सुभाष अमळनेरकर यांनी मानले. या कार्यक्रमास चंद्रकांत चौधरी, अर्जुन प्रसाद, रौनक, सतिश चौरसिया, पायल, अश्विनी, राखी, अभिषेक, वैभव, रजत, जयश्री, आशिक, आयुष, राहुल, युवराज कोळी, बाळू बारेला आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

Railway To Run Special Trains: खान्देश वासियांनो लक्ष द्या! हटिया, संतरागाछीसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या..

Leave a Comment