होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

तरुणांसाठी खूशखबर! आरोग्य विभागातील विविध पदांची भरती होणार टप्याटप्याने: मंत्री प्रकाश आबिटकर

On: March 23, 2026 3:07 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: वाढती बेरोजगारी हा सध्या कळीचा मुद्दा आहे, एका जागेसाठी हजारो तरुण भरतीसाठी येत असतात, त्यात शासनाच्या भरती वेळेत होईल की याची शाश्वती नसते, त्यामुळे तरुणांना नैराश्य येते आता एका महत्त्वाची बातमी आहे, आरोग्य विभागात लवकरच भरती होणार आहे. याबाबत विधानसभेत आरोग्यमंत्र्यानी माहिती दिली. आरोग्य विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने जिथे काम सुरू आहे तिथे नियमानुसार कार्यवाही केली जात आहे. आरोग्य विभागातील पदभरती करण्याकरिता नवीन आकृतिबंध तयार करण्यात येत असून, विविध पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तरावेळी सांगितले. सदस्य नाना पटोले यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री आबिटकर म्हणाले, आरोग्य विभागातील पदभरतीसाठी नवीन आकृतिबंध तयार करण्यात येत असून, विविध पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सुमारे 10 हजार कर्मचारी कार्यरत आहे, त्यांच्या सेवासंबंधीही निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू आहे. आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील कर्मचारी मोठ्या प्रमाणात कार्यरत असून, त्यांच्या वेतन आणि हक्कांबाबत तक्रारी आल्यास त्या गांभीर्याने घेतल्या जातील. कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करताना सेवा अधिक परिणामकारक करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदस्य नाना पाटोले यांच्यासह सदस्य हेमंत ओगले, भास्कर जाधव यांनी उपप्रश्न उपस्थित करुन चर्चेत सहभाग घेतला.

दरम्यान कंत्राटे का असेना गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभागातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत त्याबाबत आरोग्य कर्मचारी संघटनानी लक्ष वेधले होते. सदस्य नाना पाटोळे यांच्यासह इतर विधिमंडळ सदस्यांनी ही हा प्रश्न उपस्थित केल्याने लवकरच पद भरती होऊन नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment