होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जागतिक बाजारात तेलाची दरवाढ, तेल कंपन्यांच्या उत्पादन शुल्कात घट; केंद्राचा कंपन्यांना अंशतः दिलासा

On: March 27, 2026 8:06 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: आंतरराष्ट्रीय बाजार तेलाच्या किंमती वाढल्या आहे. तेल कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच किरकोळ पेट्रोल पंपांवरील किमती स्थिर ठेवण्याचे आव्हान सरकार समोर आहे, मात्र तेल कंपन्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याने नुकसानग्रस्त तेल विपणन कंपन्यांनाही अंशतः दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने आज पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रती लीटर दहा रुपयांची घट केली, आणि ती तात्काळ लागू करण्यात आली आहे. जागतिक बाजारात तेलाच्या किमतींचा उडालेला भडका लक्षात घेऊन, ही घट करण्यात आली आहे.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किमती वाढत असून, गेल्या महिनाभरात, त्या प्रती बॅरल 70 डॉलर्सवरुन, प्रती बॅरल 122 डॉलर्सपर्यंत पोहोचल्या आहेत. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष आणि त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने, केवळ चार आठवड्यातच 75 टक्क्यांची वाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलची किरकोळ विक्री करणाऱ्या पेट्रोलपंपांवरच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी उत्पादन शुल्कात ही घट करण्यात आली, किरकोळ पेट्रोल पंप धारकांपर्यंत ती झळ पोहचू नये,याची काळजी घेण्यात आली आहे. त्याऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि या काळात ग्राहकांना त्यांच्या पुरवठ्यापेक्षाही कमी किमतीत इंधन पुरवठा सुरू ठेवला आहे, त्यामुळे कंपन्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याने या निर्णयाने अंशतः दिलासा मिळणार आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या कच्च्या तेलाच्या किमती लक्षात घेता तेल कंपन्यांना पेट्रोलमध्ये 26 रुपये प्रतिलीटर तर, डिझेलमध्ये 81.90 प्रती लीटर एवढे नुकसान सोसावे लागत आहे. यामुळे, तेल विपणन कंपन्यांचे दररोज एकत्रित नुकसान सुमारे 2,400 कोटी रुपये इतके आहे. उत्पादन शुल्क घटल्याने दोन्ही इंधनात होणारे हे नुकसान लीटरमागे 10 रुपयांनी कमी होऊ शकेल. ज्यामुळे, किरकोळ बाजारात इंधनाच्या किमतीत बदल न करता तेल विपणन कंपन्या, इंधन पुरवठा सुरू ठेवू शकतील, अशी सरकारला अपेक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment